शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam| प्रश्नपत्रिका जळाल्या तरी बारावीची परीक्षा नियोजित तारखेलाच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 10:30 IST

प्रश्नपत्रिका एका ट्रकमधून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका बुधवारी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. मात्र, प्रश्नपत्रिका जळाल्या तरी बारावीची परीक्षा नियोजित तारखेला येत्या ४ मार्चपासूनच सुरू होईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत निश्चिंत राहून केवळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रश्नपत्रिका पुन्हा छापून घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा येत्या ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या नियोजनाच्या दृष्टीने राज्य मंडळाने परराज्यातून प्रश्नपत्रिकांची छपाई करून घेतली.

या प्रश्नपत्रिका एका ट्रकमधून नाशिकमार्गे पुण्याच्या दिशेने येत असताना या ट्रकला आग लागली. त्यात बारावीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अशोक भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.

दरम्यान, प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील का, असा प्रश्न निर्माण झाला. बारावीच्या परीक्षा हा संवेदनशील विषय असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांनी परीक्षेची चिंता करू नये, असे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, पुढील दोन ते तीन दिवसांत घडलेल्या घटनेबाबत पुढे काय उपाययोजना करणार याची माहिती राज्य मंडळाकडून दिली जाईल. बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आता प्रश्नपत्रिका छापून त्याचे वितरण करण्याबाबतचे नियोजन केले जाईल.

- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र