HSC Exam 2023 | बारावीच्या Biology पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 21:19 IST2023-03-08T21:19:10+5:302023-03-08T21:19:46+5:30
पुणे विभागीय मंडळात सर्वाधिक १९ विद्यार्थ्यांचा समावेश...

HSC Exam 2023 | बारावीच्या Biology पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई
पुणे : राज्यात बुधवार, दि. ८ राेजी बारावीचा बायाेलाॅजी पेपरला काॅपी केल्याप्रकरणी २९ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पुणे विभागीय मंडळात सर्वाधिक १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच दहावीच्या हिंदी विषयाच्या पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या ८ जणांना पकडण्यात आले असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली.
बारावी परीक्षेदरम्यान विज्ञान शाखेच्या विषयांत विद्यार्थ्यांकडून काॅपी करण्याच्या प्रकारांत वाढ हाेत असल्याचे यापूर्वी झालेल्या पेपरमध्ये दिसून आले आहे. बुधवारीही बायाेलाॅजीच्या परीक्षेदरम्यान २९ विद्यार्थी काॅपी करताना आढळून आले. यापूर्वी फिजिक्स पेपरला ५० तर केमिस्ट्रीच्या पेपरला ४६ विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडण्यात आले हाेते.