शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

...अशी झाली मनोहरमामा भोसलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने कारवाई करीत भोंदू बाबा मनोहर ...

बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने कारवाई करीत भोंदू बाबा मनोहर उर्फ मामा भोसले यास सातारा जिल्ह्यातील सालपे गावी जेरबंद केले.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशिष्ट पथक नेमण्यात आले होते. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींचा पथकाने तत्काळ शोध घेण्यास सुरवात केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ मामा भोसलेचा तो वापरत असलेल्या मोबाइलवरून माग काढण्यात आला. त्यात तो सतत कार्ड बदलत होता. गुुरुवारी(दि ९) रात्रीच त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर सालपे गावातील फार्महाऊसवर पथकातील पोलीस पोहचले. हे फार्महाऊस एका डोंगरावर निवांत ठिकाणी आहे. पोलीस पोहचले तेव्हा मामा भोसले या ठिकाणी पोहचले, तेव्हा एका खुर्चीवर निवांत बसला होता. यावेळी तो मोबाइलवर बोलण्यात व्यस्त होता. पोलीस या ठिकाणी त्यांच्या खासगी वाहनातून पोहचले. पोलिसांना पाहताच मनोहर मामाला धक्काच बसला. पोलिसांनी दाखल गुन्ह्याची माहिती देत कारवाईची माहिती दिली. त्यावर ‘चला येतो’ म्हणत तो पोलिसांबरोबर गाडीत बसून बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहचला. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडत त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग प्रमुख नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस हवालदार विजय कांचन, अजय घुले, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी ही कारवाई केली.

——————————————————

फोटोओळी—पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आरोपी मनोहर मामा भोसले.

१००९२०२१ बारामती—०४