शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

...आता जगायचं कसं?

By admin | Updated: August 18, 2015 03:45 IST

माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर

लोणी भापकर : माळरानावर चारा नाही... शेतात पाणी नाही... बागायती भागात रानं मोकळी नाहीत... पूर्वीसारखं मेंढरं घेऊन कोकण अथवा बागायती भागाकडे जावं तर मुलांच्या शिक्षणाचं काय? घरातील वृद्ध व्यक्तींची हेळसांड होते. दिवसेंदिवस पाऊस-पाणी कमी होतोय. त्यामुळे शेती उजाड तर माळरानावर चारा नाही. पूर्वी मेंढरांवर उदरनिर्वाह व्हायचा. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या याच व्यवसायात राहिलो. त्यातून शिक्षण घेतलं नाही. आता सततची चारा व पाणी टंचाई; बागायती भागात उसाखालील क्षेत्र वाढले. त्यामुळे मेंढरं सांभाळणे जिकिरीचे होत आहे. शिक्षण नाही, इतर कला नाही. त्यामुळे आता जगायचं कसं?... ही व्यथा आहे बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील मेंढपाळ दत्तू मासाळ, शिवाजी मासाळ यांची. बारामतीच्या जिरायती भागातील मासाळवाडी, पळशी, मुढाळे, मोराळवाडी, कानाडवाडी, मोढवे, जोगवडी, तरडोली या वढाणे, बाबुर्डी या भागात मेंढपाळांची मोठी संख्या आहे. मागील चार वर्षे पावसाने ओढ दिल्याने येथील मेंढपाळांपुढे चारा व पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी उन्हाळयातील महिना दोन महिने जाणवणारी टंचाई मागील काही वर्षांपासून पावसाळ्यातही जाणवू लागली आहे. पूर्वी या भागातील मेंढपाळ उन्हाळ्यात दोन महिने चाऱ्यासाठी मेंढरांसह कुटुंबे घेऊन कोकण, उत्तर महाराष्ट्रात जात असत. पावसाळा सुरू होताच गावाकडे परतत असत. कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने व गावाकडील शेती करता येत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत मेंढपाळवर्ग या व्यवसायात टिकून होता. मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण घटले. त्यातच पुण्या- मुंबईकडील भांडवलदारांनी जिरायती भागातील पडीक जमिनी घेऊन तारेची कंपाऊंड घातली. तर बागायती भागात उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. याबरोबरच शासनाच्या सामाजिक वनीकरणाचा जाच वाढत राहिल्याने मेंढरांना चरण्यासाठी क्षेत्रच उरले नाही. स्वत:च्या शेतात चारा करावा, तर पाऊस नाही. विहिरी कोरड्या आहेत. त्यामुळे मेंढरांना सध्या टँकरने विकत घेऊन घमेल्यात पाणी पाजावे लागत असल्याची खंत पळशी येथील मेंढपाळ रामा माने, मुढाळे येथील अण्णा ठोंबरे यांनी व्यक्त केली. शिक्षण घेतलेली पिढी या व्यवसायातून बाहेर पडेल. परंतु, ती संख्या अल्प आहे. शिक्षणाअभावी हा व्यवसाय करणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. मेंढपाळ व्यवसाय केवळ कोरडवाहू भागात आहे. मात्र, तेथील शेती पाण्याअभावी पडीक आहे. मेंढरांची खांड घेऊन बाहेर पडावे तर मुलांच्या शिक्षण थांबते, अशा कात्रीत मेंढपाळवर्ग सापडल्याची व्यथा मासाळवाडी येथील मेंढपाळांनी व्यक्त केली.

(वार्ताहर)