शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचारासाठी विद्यापीठांची वसतिगृहे प्रशासन ताब्यात घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 13:48 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

ठळक मुद्देगरज भासल्यास इतर महाविद्यालयांची वसतिगृहे घेणार सुमारे ४ ते ५ हजार खोल्या ताब्यात घेण्याची प्रशासनाची तयारी

पुणे : कोरोनाबाधित व संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृह जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी नसली तरी पुढील काळात आवश्यकता भासल्यास सुमारे ४ ते ५ हजार रुग्णांना निगराणीखाली ठेवता येऊ शकेल, अशी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास इतर महाविद्यालयांची वसतिगृहेसुद्धा ताब्यात घेतली जाऊ शकतात. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोना ‘पॉझिटीव्ह’ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठांशी व शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून वसतिगृहांमध्ये उपलब्ध असणाऱ्या खोल्यांची माहिती प्रशासनाकडे जमा केली आहे.पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ म्हणाले, की विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार  विद्यापीठांची व अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या प्रामुख्याने मोठी वसतिगृहे ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ यांसह सिंहगड इन्स्टिट्यूट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची वसतिगृहे ताब्यात घेतली जाणार आहेत. सुमारे ४ ते ५ हजार खोल्या ताब्यात घेण्याची प्रशासनाची तयारी आहे. पुढील काळात शहरातील इतर महाविद्यालयांची कमी क्षमतेची वसतिगृहे ताब्यात घेतली जाऊ शकतात.............विद्यापीठातील वसतिगृहे ताब्यात घेण्याबाबत विभागीय आयुक्तांशी गुरुवारी संवाद झाला. विद्यापीठाची सर्व वसतिगृहे प्रशासनाला देता येणार नाहीत. सध्या विद्यापीठातील वसतिगृहात अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत आहेत. त्यांचे साहित्य वसतिगृहातील खोल्यांमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलेली वसतिगृहे सोडून गेस्ट हाऊस, सेट गेस्ट हाऊस व अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजचे वसतिगृह देण्यास हरकत नसल्याचे प्रशासनाला कळविले आहे. विद्यापीठाकडून ७० ते ९छच्० खोल्या प्रशासनाला तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ