शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
3
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
4
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
5
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
6
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
7
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
8
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
9
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
10
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
11
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
12
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
13
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
14
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
15
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
16
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
19
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
20
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले

नोंदणीकृत परिचारिका नसलेल्या रुग्णालयांचे परवाने रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 8:06 PM

नोंदणीकृत परिचारिका असल्याशिवाय शहरातील रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करु नये, असे आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरुशासनाने या नियमामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणावी अशी मागणी

पुणे: सर्व अधिकृत रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे (एमएनसी) नोंदणी असलेल्या परिचारिकांचीच नेमणूक करणे बंधनकारक आहे. परंतु , आजही शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये मान्यता प्राप्त संस्थांमधून शिक्षण न घेतलेल्या, अर्धवट शिक्षण घेतलेल्या व महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी न केलेल्या परिचारिकांची नियुक्ती केली जाते. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने अशा नोंदणीकृत परिचारिका नसलेल्या रुग्णालयाचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व रुग्णालयांना ३१ मार्चपूर्वी माहिती सदर करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत शहर, उपनगरांतील रुग्णालये, दवाखाने आणि  प्रसूतिगृहांमध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणीकृत परिचारिका आहेत का याची माहिती संकलित करण्यात येत आहे. नोंदणीकृत परिचारिका असलेल्या रुग्णालयांचे परवान्यांचे नूतनीकरण करणे व नोंदणीकृत परिचारिका नसलेल्या रुग्णालयांचे परवाने रद्द करावेत असे शासनाचे आदेश आहेत. परंतु, सध्या शहरामध्ये मान्यता प्राप्त संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या परिचारिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. यामुळे लहान-मोठ्या रुग्णालये, प्रसूतिगृहांमध्ये एमएनसीकडे नोंदणी नसलेल्या परिचारिका काम करत आहे. महापालिकेने शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केल्यास अनेक रुग्णालयांची अडचण होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम आरोग्य सेवेवर पडू शकतो. यामुळे याबाबत शासनाने या नियमामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणावी अशी मागणी केली आहे. ---------------------------नोंदणीकृत परिचारिका असल्याशिवाय शहरातील रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करु नये, असे आदेश राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या नियमाचे काटेकोर पालन केल्यास अनेक लहान मोठ्या रुग्णालयांची अडचण होऊ शकते. यामुळे शासनाने हा नियम सरसकट लागू न करता काही प्रमाणात शिथिलता आणावी अशी मागणी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे.डॉ.प्रकाश मराठे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल कौन्सिल 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरRegistrarकुलसचिव