शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर घोडे ,बैलगाडी, सायकल; इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:00 IST

आंदोलनात सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणा

पुणे : शहरातील जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसहा घोडे,बैलगाडी, सायकल घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधी आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी घोडे तसे बैलगाड्यावर स्वार होत "मोदी तेरा अजब खेल सस्ती दारु, मेहेंगा तेल", "मोदी सरकार हाय हाय" , "सर्व सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो"  अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारताला "अश्मयुगीन दिवस" दाखवायला सुरुवात केली आहे. मोदींनी अजून थोडी कृपा केली. तर आता काही दिवसात जे चित्र दिसणार आहे, ते चित्र आज पुणे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर बघायला मिळाले. यापुढील काळात संपूर्ण देशात हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. दुचाकीवर फिरणारे काही दिवसात घोड्यांवर दिसतील. आपल्या कार ने प्रवास करणारे नागरिक काही दिवसांत  बैलगाडीमध्ये दिसतील. हा ऐतिहासिक बदल होण्यास कारणीभूत ठरली असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

''आपल्या हितसंबंधी उद्योगपतीच्या कल्याणासाठी दररोज भाजप सरकार सर्वसामान्य कुटुंबावर दरोडा टाकत असून, अजून किती दिवस या विरोधात आपण गप्प बसायचे...? आजचा सवाल या सर्वांनी संतप्त होत मोदी सरकारला विचारला. गेल्या ८ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे तिसरे आंदोलन असून महागाई कमी केली नाही, तर दररोज सर्वसामान्य जनता याच प्रकारे रस्त्यावरून उतरून निषेध करणार असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.'' 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPetrolपेट्रोलSocialसामाजिक