शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

घोड धरण ९५ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 03:02 IST

घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण ९५.५१ टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मुख्य अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी दिली.चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे. तर, मृत पाणीसाठा २ हजार १७२ दलघफू आहे. उपयुक्त पाणीसाठा ५ हजार ४६७ दलघफू एवढा आहे. तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संतत पाऊस पडल्याने या धरणसाखळीतील डिंभे, वडज, येडगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यातून ८,५०० क्युसेक्स वेगाने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे धरणात ९५.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूरनियंत्रणाच्या दृष्टीने आज सकाळी ९ वाजता २ हजार २८०, दुपारी १२.३० वाजता ६ हजार ९६० तर सायंकाळी १० हजार ४४० क्युसेक्स इतक्या वेगाने घोड धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. याचे नियमन करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र तैनात असून अधिकारीही ठाण मांडून आहेत. दरम्यान, याच धरणालगत असलेल्या पुलाला तडे गेल्याने पुलाची सुरक्षा धोक्यात आली आहे. खात्याच्या वतीने या पुलाची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी ग्रामस्थांनी पत्राद्वारे केली आहे. पुलाच्या डागडुजीचे काम त्वरित करून घेऊ, असे शाखा अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी सांगितले.उजनी भरले ७२ टक्केउजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत; तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून शेतकरी खूष आहे.बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५०० क्युसेक, तर बंडगार्डन येथून ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा येत आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत पूर नियंत्रणाच्या दृष्टीने भीमा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते.

टॅग्स :WaterपाणीDamधरण