शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसमध्ये गुंडगिरीचा थरार...! चालक–कंडक्टरला मारहाण; प्रवाशांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:58 IST

- पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी  एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही   धक्कादायक घटना  खेड–मंचर मार्गावर घडली आहे.    

पुणे :पुणे–नाशिक महामार्गावर चालत्या एसटी बसमध्ये दोन तरुणांनी  एसटी बस चालक–कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही धक्कादायक घटना  खेड–मंचर मार्गावर घडली आहे.      अधिकच्या माहितीनुसार, खेड घाटात एका थार गाडीने एसटी बसला आडवे थांबवून दोन तरुण थेट बसमध्ये शिरले. त्यांनी चालक आणि कंडक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी उपस्थित होते. अचानक सुरू झालेल्या हल्ल्यामुळे बसमध्ये ओरडाआरड झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या दरम्यान, चालकाने बस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी चालत्या बसमध्येच चालकाला मारहाण केली, त्यामुळे बसवरील नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होऊन मोठा अपघात टळला असे सांगितले जाते. मारहाण थांबवण्याचा प्रयत्न एका ज्येष्ठ प्रवाशाने केला, पण त्यांना देखील ढकलून दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. ड्रायव्हरला मारहाण करणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाला असून यावरून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत मंचर पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप असून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. या गुंडगिरीमुळे परिसरात आणि प्रवाशांमध्ये दहशत पसरली असून, कठोर कारवाईची मागणी वाढत चालली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thuggery on Pune-Nashik Highway: Goons Assault Bus Driver, Conductor

Web Summary : Two young men assaulted a bus driver and conductor on the Pune-Nashik highway, creating terror among passengers. The incident occurred near Khed-Manchar after a Thar blocked the bus. A senior passenger's attempt to intervene failed. No police case has been filed yet, causing public outrage.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या