Video : भयंकर! मोटार चालकाची 'मुजोरी'; वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन घडवली 'शहरवारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 06:39 PM2020-11-05T18:39:47+5:302020-11-05T19:32:24+5:30

विनामास्क आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन कारवाई दरम्यानचा थरकाप उडवणारा प्रकार

Horrable ! ; 'City-wise' for traffic police from bonnet by car river in pimpri | Video : भयंकर! मोटार चालकाची 'मुजोरी'; वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन घडवली 'शहरवारी'

Video : भयंकर! मोटार चालकाची 'मुजोरी'; वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन घडवली 'शहरवारी'

Next
ठळक मुद्देनागरिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले पोलिसाचे प्राण

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे विना मास्क आणि वाहतुक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारवाई सुरु असताना एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचे प्रकरण बुधवारी उघडकीस आले. ही घटना ताजी असताना विनामास्क आणि वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई दरम्यान एका मोटार चालकाने वाहतुक पोलिसाला चक्क बोनेटवरुन शहरवारी घडविल्याची भयंकर घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी चारच्या सुमारास चिंचवडमधील एल्प्रो चौकात घडली.

नागरिकांचा आरडाओरडा काही तरुणांनी केलेल्या पाठलागानंतरही सुमारे पाऊण किलोमीटर धावत्या कारच्या बोनेटवर जीव मुठीत धरुन बसले होते. नागरिकांची गर्दी झाल्याने क्रांतीवीर चाफेकर चौकात मोटारचालकाने गाडी थांबवली. मात्र, यात वाहतुक पोलिसाच्या गुडग्याच्या लिगामेंटला दुखापत झाली.

चिंचवड वाहतुक शाखेत कार्यरत असलेला आबा सावंत मोटारचालकाच्या बेदरकारपणामुळे जखमी झाले आहेत. युवराज हनवते (वय अंदाजे ५०, रा. पिंपळे निलख ) या मोटारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विना मास्क, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि या पुर्वी वाहतुक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांकडून दंड वसुली करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत चिंचवडमधील कामिनी हॉटेल जवळील अहिंसा चौकात वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी महावीर चौकाकडून क्रांतीवीर चाफेकर चौकाकडे मोटारीतून हनवते आणि त्यांच्यासमवेत एक इसम चालला होता. त्या दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. पोलीस कर्मचारी सावंत यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मोटारकार न थांबविता पोलिसाच्या अंगावर घातली. सावंत कसेबसे बोनेटवर चढले. मात्र, हनवते यांनी गाडी न थांबविता तशीच दामटली.

पोलीस कर्मचारी सावंत यांना बोनेटवर घेतल्यानंतर आजुबाजुच्या नागरिकांनी आरडाओरडा करीत गाडी थांबवण्याचा इशारा केला. काही युवकांनी दुचाकीवर पाठलाग करीत वाहनचालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतरही हनवते गाडी दामटत राहिले. अखेरीस नागरिकांच्या गर्दीमुळे एल्प्रो चौकाकडून सुरु झालेला हा थरार वाल्हेकरवाडी जुना जकात नाका येथील क्रांतीवीर चाफेकर पुलाखाली थांबला. जवळपास दहा मिनिटे सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर मोटारकार थांबविण्यात यश आले.

याबाबत लोकमतशी बोलताना आबा सावंत म्हणाले, मास्क न लावल्याने मोटार थांबविण्याचा इशारा केला होता. मात्र, चालकाने गाडी अंगावर चढवली. माझा पाय बोनेटखाली अडकला, कसाबसा बोनेटवर चढण्यात यशस्वी झालो. मात्र पाय विचित्रपद्धतीने मुडपल्याने गुडग्याच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. पाय सरळ करता येत नाही.

Read in English

Web Title: Horrable ! ; 'City-wise' for traffic police from bonnet by car river in pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.