शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आशादायी! पुण्यात चोवीस तासांत एकही मृत्यू नाही; रुग्णसंख्या २६३ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 21:44 IST

पुणे जिल्ह्यातील शनिवारी एकही मृत्यू झाला नसली तरी रुग्णसंख्येत १२ ने वाढ

ठळक मुद्देवाढत्या आकड्यांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण शुक्रवारी रात्री येरवडा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ वर

पुणे : मागील काही दिवसांत दररोज मृत्यूचा आकडा वाढत चालल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण जिल्ह्यातील नागरिकांसाठी शनिवार दिलासादायी ठरला. दिवसभर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, शुक्रवारी रात्री येरवडा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ वर गेला आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू दि. ३० मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात झाला होता. त्यानंतर दि. ६ एप्रिलपर्यंत दररोज एक-दोन मृत्यू होत होते. पण दि. ७ एपिलला एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला. तर दि. ८ एप्रिलला हा आकडा थेट ९ वर गेला. दि. ९ एप्रिल रोजीही ५ जणांचा तर शुक्रवारी (दि. १०) तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. एकुण २९ मृतांपैकी २६ जण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. तर उर्वरीत तीन जण बारामती, श्रीरामपुर व ठाणे येथील रुग्ण होते. या वाढत्या आकड्यांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोनाचा संसर्ग तसेच मृतांचा आकडा वाढू लागल्याने प्रशासनाकडूनही अनेक बंधने लावली जात आहेत. पण शनिवारी मात्र जिल्ह्यात एकाही मृत्यू नोंद झाली नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा येरवडा येथील ६४ वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या महिलेला दि. ९ रोजी खासगी रुग्णालयातून ससुनमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. या महिलेला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता.---------------------रुग्णसंख्या २६३ वरपुणे जिल्ह्यातील शनिवारी एकही मृत्यू झाला नसली तरी रुग्णसंख्येत १२ ने वाढ झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांच्या तुलनेत ही वाढही कमी आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या २६३ वर पोहचली आहे. त्यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात २२२, पिंपरी चिंचवडमध्ये २९ तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात ९ तर पिंपरीमध्ये ३ असे एकुण १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल