शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
2
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
3
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
4
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
5
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
6
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
7
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
8
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
9
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
10
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
11
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
12
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
13
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
14
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
15
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
16
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
17
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
18
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
19
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
20
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा

पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का बार, बड्या हाॅटेल्सवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 13:11 IST

हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत कारवाई सुरू करण्यात आली

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच बाहेरील वस्तीतील (out skirts)  हाॅटेल्स, बार मध्ये पहाटेपर्यंत तरुणाईच्या सुरू असलेल्या हुक्का पार्ट्यां व त्यामुळे उद्भवणारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत ताबडतोब कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार आठवड्या पासून ही कारवाई पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. 

कोरोना नंतर सुरु झालेल्या न्यू नाॅर्मल लाईफस्टाईल मध्ये पुण्यातील तरुणाईमध्ये रात्री उशिरापर्यंत हाॅटेलींग करणे तसेच हुक्का पार्टीचे प्रमाण अधिकतेने वाढत असल्याचे निदर्शनास आलेने त्यावर योग्य नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सामाजिक सुरक्षा विभागास दिली आहे. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत व विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरच असलेल्या हाॅटेल्स, बारना प्रथम वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यानंतरही आस्थापना विहीत वेळेत बंद होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.

या विशेष मोहीमे अंतर्गत शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या दरम्यान पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील मुंढवा पो. स्टे. हद्दीतील ' वाॅटर बार', येरवडा  पोलीस स्टेशन हद्दीतील 'द हाउज अफेअर' आणि  कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील 'रुफटाॅप व्हिलेज', व 'अजांत जॅक्स' अशा विविध हाॅटेल्स बार आस्थापनावर छापा टाकून, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याबद्दल, त्यांचे  विरूद्ध, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ क्ष अन्वये  कारवाई करण्यात आली आहे.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत सदरची विशेष मोहीम राबवित असता कल्याणीनगर येथील 'द हाउज अफेअर',  मुळीक कॅपीटल बिल्डिंग, कल्याणी नगर या बार मध्ये पहाटे  ०२.५५ वा. च्या  सुमारास अवैध रित्या हुक्का बार चालू असल्याचे समजलेने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा कारवाई करण्यात आली.  असता, घटनास्थळावर ६ हुक्कापॉट्स, चिलीम  व वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ, ३ मोबाईल, १ डिव्हिआर व इतर साहित्य असे एकुण रु. ८९, ६०० /- चा मुद्देमाल मिळून आलेने तो कायदेशीररीत्या  जप्त करून 'द हाउज अफेअर' रेस्टॉरंट व बारचे १) सौरभ दत्तात्रय नवगण, वय-३५ वर्षे, धंदा - मॅनेजर, रा. ४०३, बी-२, सिल्वर ओक सोसायटी, कल्याणी नगर, येरवडा, पुणे, २) प्रसन्न उत्तम पाठक, वय-२४ वर्षे,धंदा-मॅनेजर, रा. १५ बी, आशा, श्री राधा विलास सोसायटी, कोरेगाव पार्क, पुणे, ३) श्रवण भुटन मंडल वय-३४ वर्षे, धंदा- सुपरवायझर, रा. टेम्पो ३४, अमन अनुप हॉटेल जवळ, वडगाव शेरी, पुणे अशा तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सदर आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. २२०/२२, कलम ४ (अ), २१ (अ) सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम - २०१८ चे अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सदर 'द हाउज अफेअर' या आस्थापनेविरूद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३ क्ष अन्वये देखील कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेhotelहॉटेलPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी