शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘त्या’ अस्सल वाचकाचा पुरस्कार देऊन सन्मान !

By श्रीकिशन काळे | Updated: January 7, 2025 14:46 IST

पुणे पुस्तक महोत्सवातील तिचा फोटो झालेला व्हायरल

पुणे : ‘ती’ पुणे पुस्तक महोत्सवात कचरावेचकाचे काम करत होती. पण ती खुद्द एक अस्सल वाचक असल्याने ‘ती’ एका पुस्तकाच्या स्टॉलवर थांबली. ‘जग बदलणारा बापमाणूस’ तिच्यासमोर होता. तिने ते पुस्तक हातात घेतले. एका हातात कचऱ्याची पिशवी तर दुसऱ्या हातात पुस्तक, असे छायाचित्र नंतर खूप व्हायरल झाले. कचरा वेचणारी देखील वाचक आहे, हे पाहून अनेकांना कौतुक वाटलं. त्यामुळे त्या वाचक प्रीती मोहिते यांचा लेखक जगदीश ओहोळ यांनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मोटिवेशनल पद्धतीने लेखक जगदीश ओहोळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या पुस्तकाच्या स्टॉलवर ‘ती महिला थांबली होती. तेव्हा खुद्द लेखकानेच तिचा फोटो काढला. या पुस्तकाच्या ३० व्या आवृत्तीचे प्रकाशन गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, कामगार नेते महादेव वाघमारे व लेखक जगदीश ओहोळ यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा त्या वाचकाचा सन्मान केला.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांचा क्रांतीज्योती - क्रांतीसुर्य व बापमाणूस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली होती. तसेच यावेळी कार्यक्रमाला वाचक श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जग बदलणारा बापमाणूस पुस्तक खरेदीसाठी गेलेली व ते वाचताना क्लिक झालेला फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर सबंध जगभर त्या फोटोमुळे चर्चा झाली. ती तरुणी प्रीती मोहिते हिस जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने 'विशेष वाचक' म्हणून रोख रकमेसह पुरस्कार दिला. तसेच यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनीही या तरुणीला पुस्तकं खरेदी व वाचनासाठी सहकार्य म्हणून पाच हजार रुपयांची रोख मदत दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडStudentविद्यार्थीEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र