मुंबई-पुणे ट्रॉमा केअर सेंटरबाबत होईना एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:48 IST2017-11-24T00:48:23+5:302017-11-24T00:48:45+5:30
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासोबतच जखमींवर उपचार करण्यासाठी ओझर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’साठी आलेल्या तीन खासगी रुग्णालयांच्या प्रस्तावांवर अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

मुंबई-पुणे ट्रॉमा केअर सेंटरबाबत होईना एकमत
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांचे जीव वाचविण्यासोबतच जखमींवर उपचार करण्यासाठी ओझर्डे येथे उभारण्यात आलेल्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’साठी आलेल्या तीन खासगी रुग्णालयांच्या प्रस्तावांवर अद्यापही एकमत झालेले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार घडणाºया अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जखमींचे प्राण वाचविणे अवघड होत आहे. त्यामुळे या द्रुतगती मार्गावर उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी ओझर्डे येथे बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी चार खासगी रुग्णालयांचे प्रस्ताव आलेले होते. यातील दोन रुग्णालयांना समान गुण मिळाले. दोन्ही रुग्णालयांचे अपघातग्रस्तांना सेवा देण्याचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ तपासण्यात आले. यातील एका रुग्णालयाला हे सेंटर चालविण्यासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, एका मंत्रिमहोदयांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.