शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बऱ्हाणपूरच्या पोलिस उपमुख्यालयाला गृहमंत्रालयाची मंजुरी;वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:49 IST

५० एकरात उभारणार पोलिस उपमुख्यालय

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश 

बारामती : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथे प्रस्तावित असणाऱ्या पोलिस उपमुख्यालयाला राज्याच्या गृहमंत्रालयाने शुक्रवारी (दि. २८) मंजुरी दिली आहे. ५० एकरावर हे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. या उपमुख्यालयाच्या निमित्ताने बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलिस बंदोबस्त येईपर्यंत तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होत असते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण राखणे व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय कार्यरत होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ उपविभाग व त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या २८ पोलीस ठाण्याचा समावेश  असणार आहे.  

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र, मुख्यालयापासूनचे अंतर, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये व गुन्ह्याच्या संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस मुख्यालयातून बारामती येथील पोलीस बंदोबस्त येईपर्यंत तीन ते साडेतीन तासांचा कालावधी जातो. त्यामुळे स्थानिक पोलिसांना अपुरे मनुष्यबळाअभावी तेथील परिस्थिती आटोक्यात आणणे अत्यंत अडचणीचे होते. जिल्ह्याच्या आस्थापनेवर एकच पोलीस मुख्यालय कार्यरत आहे. त्यामुळे बऱ्हाणपुर येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. पोलीस उपमुख्यालयाकरिता आवश्यकपद निर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाकरिता प्रशासकीय इमारत व इतर अनुषंगिक अनावर्ती खर्च हा सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन वार्षिक योजनेमधुन भागविण्यात येणार आहे.

 सध्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ही दोन कार्यालय आहेत. पुणे जिल्ह्यातील अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात बारामती,हवेली, भोर, दौंड या चार उपविभागांचा समावेश आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक पुणे यांचे कार्यक्षेत्रात लोणावळा, देहुरोड, खेड, जुन्नर या चार उपविभागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक बारामती यांचे कार्यक्षेत्रात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, उजनी, वीर,भाटघर ही महत्वाची धरणे आहेत. सोमेश्वर, जेजुरी, मोरगाव, थेऊर, रांजणगावही प्रमुख तीर्थक्षेत्र असून जिल्ह्यातील अति महत्त्वाची ठिकाणे आहेत.बारामती येथे विमानतळ, दौंड येथील रेल्वे जंक्शन, लोणी काळभोरला पेट्रोलियम पदार्थांचा साठा आहे. प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. त्यामुळे कायदासुव्यव्स्थेंचा प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने पुणे उपमुख्यालयाचीउभारणी करण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

जिल्हा उपमुख्यालयात यांचा समावेश    ट्रेनिग सेंटर    प्रशासकीय भवन    विभाग निहाय कर्मचारी निवास्थाने    पोलीस हॉस्पिटल    मोटार परिवहन विभाग     शॉपिंग सेंटर     बहूद्देशीय हॉल     परेड मैदान     गोळीबार मैदान     पोलीस अधिकारी व कर्मचारी विश्रांतीगृह     स्विमिंग पूल

प्राथमिक कामकाजासाठी २ कोटी मंजूरबारामती तालुक्यात बऱ्हाणपूर येथे ५० एकर क्षेत्रांवर जिल्हा उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. प्राथमिक बाब म्हणून संरक्षण भिंत व प्रवेशद्वार उभारण्यासाठी लागणाऱ्या २ कोटी खर्चास मजुरी यापूर्वी देण्यात आली होती.

.....................

पुणे जिल्ह्याच्या दक्षीण भागात कायदा सुव्यवस्था व प्रशासकीय नियंत्रण या दृष्टिकोनातून पुरेसा बंदोबस्त सारखा पुरवावा लागतो असतो. याठिकणी उपमुख्यालय झाल्यास वेळेत बंदोबस्त पुरवणे सोयीचे होणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था राखणे सोपे जामार आहे.- नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती.----------------------------------

टॅग्स :baramati-acबारामतीPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुखministerमंत्री