पुणे : आयुष्यं म्हटलं की संघर्षही न चुकता आलाच. या संघर्षाला मग वयाचे बंधन तरी कोठे आले हो. ज्या वयात कुटुंबातील छोट्या छोट्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत तसेच देवाजीच्या नामस्मरणात घरात वेळ घालवायचा असतो तिथे एक आजीबाई दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या हिमतीवर पार पाडत आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी शरीर साथ देत नसताना देखील त्यावर मात करत तरुणांना लाजवेल अशी थरारक 'कामगिरी'करत आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत आणि साडी भेट म्हणून दिली आहे.
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 17:45 IST
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला व्हिडिओमुळे या आजींचे कष्ट व जगण्यासाठीचा संघर्ष नुकताच समोर आला आहे. या आज्जीबाईंचे नाव आहे शांताबाई पवार.
'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत
ठळक मुद्देआज या आज्जीबाईंची खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली आणि एक लाखांची मदत दिली आहे.हा व्हिडिओ पाहून अभिनेता रितेश देशमुख यांनीही त्यांचा हा काठी फिरवताना चा व्हिडिओ शेअर करत 'वॉरिअर आजी' असे त्याला कॅप्शन दिले.