सुटीसाठी एसटी, आराम बस सज्ज

By Admin | Updated: April 10, 2015 05:39 IST2015-04-10T05:39:49+5:302015-04-10T05:39:49+5:30

उन्हाळी सुटीनिमित्त एसटीसह खासगी कंपन्या, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची सोय केली आहे. प्रवाशांना सोय व्हावी, यासाठी एसटी आगार आणि खासगी

Holidays for ST, Comfort Bus Ready | सुटीसाठी एसटी, आराम बस सज्ज

सुटीसाठी एसटी, आराम बस सज्ज

नीलेश जंगम, पिंपरी
उन्हाळी सुटीनिमित्त एसटीसह खासगी कंपन्या, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याची सोय केली आहे. प्रवाशांना सोय व्हावी, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसऱ्या दिवसापासूनची आरक्षणे फुल झाली आहेत. ११ एप्रिलपासून राज्यातील विविध भागातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. गाड्यांमध्ये कोणताही तांत्रिक दोष राहणार नाही, प्रवाशांना अडचणी निर्माण होऊ नयेत याची काळजी बसचालकांडून काळजी घेतली जात आहे.

Web Title: Holidays for ST, Comfort Bus Ready