शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भग्रंथ न वापरता लिहिलेला इतिहास ‘भीषण’ : डॉ. उदयसिंह पेशवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 13:45 IST

जे काल्पनिक आहे तेच खरे वाटते....

ठळक मुद्दे ‘पेशवेकालीन जेजुरी’ पुस्तकाचे प्रकाशन खोटा इतिहास पसरविणाऱ्या समाजमाध्यमांतील  ‘वाचाळवीरांना’ लक्ष्य

पुणे :  कोणताही संदर्भग्रंथ न वापरता लिहिलेला इतिहास ‘भीषण’ असतो. त्यामुळे अनेक घोटाळे होतात. जे काल्पनिक आहे तेच खरे वाटते, अशा परखड शब्दांत पेशव्यांचे १३ वे वंशज डॉ. उदयसिंह पेशवा यांनी खोटा इतिहास पसरविणाऱ्या समाजमाध्यमांतील  ‘वाचाळवीरांना’ लक्ष्य केले. अनुबंध प्रकाशनाच्या वतीने मोडी लिपीचे अभ्यासक आणि इतिहास संशोधक योगेंद्र ऊर्फ राज मेमाणेलिखित ‘पेशवेकालीन जेजुरी’ पुस्तकाचे प्रकाशन  पेशव्यांचे १३वे वंशज श्रीमंत डॉ. उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. होळकर घराण्याचे १३वे वंशज राजेभूषणसिंह होळकर, बाळासाहेब पेशवे (जेजुरीकर) आणि  प्रकाशक अनिल कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.पेशवा आणि होळकर यांचा जुना संबंध आहे, असे सांगून पेशवे घराण्याशी संबंधित ज्या काही आख्यायिका सांगितल्या जातात, त्याचा डॉ. उदयसिंह पेशवा यांनी खरपूस समाचारही घेतला. नानासाहेब पेशवा यांनी एप्रिल १७४९मध्ये पर्वती देवस्थानाची निर्मिती केली. तिथे छत्रपती शाहूमहारांच्या स्मृती जपल्या असे सांगितले जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. मात्र, त्या वेळी शाहूमहाराज हे हयात होते. १५ डिसेंबर १७४९ रोजी म्हणजे सहा महिन्यांनंतर ते निर्वतले. त्यामुळे ‘स्मृती जपल्या’ असे म्हणता येणार नाही. देवेश्वराची जी मूर्ती आहे, ती शाहूमहाराजांच्या चेहºयाची बनवली. तेव्हा आपला जो धनी असेल त्याच्या चेहºयाची मूर्ती बनवायचे. एकदा राजपूत घराण्याकडून मला पत्र आले, की सदाशिवरावांची मुलगी आमच्या घराण्यात दिली होती; पण हे शक्यच नव्हते. कारण, सदाशिवराव पेशवे यांना अपत्यच नव्हते. ते पानिपतामध्ये मारले गेले. अनेक मजेदार गोष्टी जपल्या जातात आणि जे काल्पनिक आहे तेच खरे वाटायला लागते.आज  सोशल मीडियावर इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाची कागदपत्रे भारतभर आहेत. इतिहासाविषयी वाट्टेल त्या पोस्ट टाकल्या जातात. कोणतीही पोस्ट लिहिण्यापूर्वी कृपया संदर्भ विचारले जावेत. कारण, अशा पोस्टमधून जातीय तेढ निर्माण केली जाते, याकडे मेमाणे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मानसी आंब्रेकर यांनी सूत्रसंचालन  केले. ......होळकर घराण्याने कुलदैवत जेजुरीची सेवा केली आहे. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जी काही प्रमाणात दुर्लक्षित आहेत, त्या स्थळांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. इतिहास-अभ्यासकांनी अशी स्थळे शोधून काढायला हवीत. तसेच, अप्रकाशित इतिहास समोर आणायला हवा.  - राजेभूषणसिंह होळकर ....होळकर घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदानयोगेंद्र मेमाणे यांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,  ‘‘या पुस्तकामधील इतिहास मोडी लिपीच्या कागदपत्रांवरून लिहिलेला आहे. चुका घडू द्यायचा नाहीत, असे ठरविले होते. मी पेशवे दफ्तरात जायचो. जेजुरीचे कागद पाहायला सुरुवात केली. यावर एक छान पुस्तक होईल, असे वाटले. इतिहासाच्या नोंदी घेणे, समकालीन संदर्भ तपासणे या गोष्टी कराव्या लागल्या.  हे पुस्तकलेखन माझ्यासाठी आव्हान होते. जेजुरीच्या जडणघडणीमध्ये होळकर घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.’’

टॅग्स :Puneपुणेhistoryइतिहास