शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 14:47 IST

मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी 'मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं'' असा विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

ठळक मुद्देस्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा

पुणे : मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी 'मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं'' विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. अनेक राजकीय नेते या वक्तव्यावर टीका टिप्पणी करू लागले आहेत. त्यातच पुण्यात खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी सुद्धा या विधानावर देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. असं विधान करणाऱ्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं असं राऊत म्हणाले आहेत. पुण्यातील महावीर जैन महाविद्यालयात ते एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.   

राऊत म्हणाले, कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी हे नाटक फार गाजलं. रंगमंचावर आम्हालाही दिल्लीत गेल्यावर असं वाटतं त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पहावीत, स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं. असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.'' 

काय म्हणाले होते फडणवीस 

गेले दोन वर्ष सातत्याने राज्यभर फिरून लोकांशी बोलतोय. त्यांचं प्रेम अजिबात कमी झालेले नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नसून तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मला जनतेने कधी मी मुख्यमंत्री नसल्याचे जाणवू दिले नाही. त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करतोय. ज्या दिवशी जनतेचा आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा इथं देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईन,' असंं फडणवीस म्हणाले होते.

आतापर्यंत शिवसेनेचा महापौर नाही यांची खंत वाटते 

 पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ''महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहे. राज्यात गेली दोन वर्षे ठाकरे - पवाराचांच बोलबाला हे आगामी काळातही तो दिसेल. पण आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत.''

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा