शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी ते शिवाजीनगर Pune Metro कामाचा शुभारंभ नवरात्रीच्या मुहूर्तावर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 20:26 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला भूसंपादनाचा ऑनलाईन आढावा

ठळक मुद्देहिंजवडी ते शिवाजीनगरसाठी आवश्यक असलेले भूसंपादन ९७ टक्के पूर्ण

पुणे :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा शुभारंभ नवारात्रीच्या मुहूर्तांवर करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांनी सोमवारी मेट्रोसह जिल्ह्यातील अन्य सर्वच प्रकल्पाच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. 

पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पानंतर त्वरीत पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. परंतु तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्यापही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांचा दर महिन्याला आढावा सुरू केला आहे. कोरोनामुळे गेले दीड वर्षे सर्वंच प्रकल्पांची कामे रखडली होती. परंतु जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी कोरोनासोबतच विकास कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामाला पुढाकार देण्यास सुरुवात केली. यामुळेच गेल्या एक वर्षात सतत पाठपुरावा करून हिंजवडी ते शिवाजीनगरसाठी आवश्यक असलेले भूसंपादन ९७ टक्के पूर्ण केले. यामुळेच आता मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. 

३ वर्षे ४ महिन्यात काम पूर्ण होणार या प्रकल्पाचे काम टाटा- सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. २४ किमी मेट्रो लाईन तयार करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागतो. परंतु हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प तीन वर्षे चार महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठरलेल्या मुदतीत हे पूर्ण करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.

मेट्रो, रिंगरोड,  मेडिकल कॉलेज सर्वच प्रकल्पांचा आढावा 

''उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतात. त्याप्रमाणेच सोमवार (दि.27) रोजी देखील त्यांनी आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी काही अडचण नाही ना याचा आढावा घेतला. याशिवाय रिंगरोड,  पालखी मार्ग,  मेडिकल कॉलेजसह अन्य सर्वच प्रकल्पांचा आढावा घेतला. असं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं.'' 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPMRDAपीएमआरडीएAjit Pawarअजित पवारcollectorजिल्हाधिकारी