शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आॅनलाईन व्यवहारांना धोक्याची घंटा, डेबिट, क्रेडिट व एटीएमकार्डच्या माध्यमातून सर्वाधिक गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 03:22 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैशाचे आॅनलाईन व्यवहार करणे, सोशल माध्यमांद्वारे व्यक्त होणे तसेच आपला डेटो आॅनलाईन सेव्ह करणे अशी अनेक कामे अगदी सोपी झाली आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.

- सनील गाडेकरपुणे - आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैशाचे आॅनलाईन व्यवहार करणे, सोशल माध्यमांद्वारे व्यक्त होणे तसेच आपला डेटो आॅनलाईन सेव्ह करणे अशी अनेक कामे अगदी सोपी झाली आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. कारण शहरात दररोज तब्बल १५ सायबर क्राईम होत असल्याची माहिती समोर आली आहे.या गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाण डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे आहे. त्याची आकडेवारी जवळपास ७५ टक्क्यांच्या घरात आहेत. सायबर क्राईम विभागाकडे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत असे गुन्हे घडल्याचे तब्बल २ हजार ७९९ अर्ज आले असून त्यातील सर्वाधिक २ हजार १०८ तक्रारी डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आहेत. या तक्रारींची सरासरी पाहिली असता शहरात दररोज १५ अर्ज दाखल होत आहेत. २०१६ मध्ये २ हजार ७९, तर २०१७ मध्ये ५ हजार ७४१ तक्रार अर्ज दाखल झाले आहे. या गेल्या काही महिन्यांपासून आॅनलाइन व्यवहार करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॅशबॅक, डिस्काऊंट, गिफ्ट व्हावचर अशा आॅफरमुळे पेटीएम, फोन पे, टेझ, फ्रीचार्ज अशा मोबाइल अ‍ॅप्लिकेशन व अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ईबेसारख्या संकेतस्थळांचा सध्या सर्रास वापर होत आहे. त्यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा एटीएमकार्डचा वापर करण्यात येतो. तसेच काही ठिकाणी या कार्डचे क्लोनिंग करून व ओटीपी पाठवून फसवणूक केल्याचे प्रकार होत आहेत. तुमच्या एटीएमकार्डची वैधता संपली असून नवीन कार्डसाठी सीव्हीव्ही नंबर आणि त्यानंतर आलेला ओटीपी सेंड करा, असे फोन विविध प्रकारचे कार्ड वापरणाºयांना येतात. फोनवर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्याने सीव्हीव्ही आणि ओटीपी सांगितला, की त्यांच्या खात्यातून काही रक्कम कमी झाल्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. तसेच फेसबुकच्या माध्यमातून परदेशी व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध निर्माण होतात. काही दिवसांनी परदेशी व्यक्ती महागडे गिफ्ट पाठवते. मात्र ते विमानतळावर किंवा आयकर विभागाकडे अडकले असून ते सोडविण्याचा बहाणा करून लाखो रुपये उकळले जातात. पण पैसे देणाºया व्यक्तीला ना ते गिफ्ट मिळतात, ना फसवणूक करणारे परदेशी नागरिक. क्लोनिंग, विमा, जॉब, लॉटरी, मोबाइल टॉवर, टूर पॅकेज, मार्केटिंग अशा गुन्ह्यांत समावेश आहे.व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून २२५ गुन्हे : १, २७६ तक्रार अर्ज१ व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे आजच्या तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. एक दिवस जरी इंटरनेट बंद असले तर त्यांना अगदी नको नको होऊन जाते. बदलत्या जीवनशैलीनुसार हे माध्यम आवश्यक असले तरी त्याचा प्रत्येक वेळी चांगल्याच कामासाठी वापर होतो असे नाही.२व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बदनामी, अश्लील फोटोटाकणे आणि कमेंट केल्याप्रकरणी अडीच वर्षांत २२५ गुन्हे घडले आहेत.३सायबर क्राईम हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित नसून सोशल माध्यमातून बदनामी, हॅकिंग आणि डाटाचोरी असे गुन्हेदेखील या माध्यमातून केले जात आहेत. फेसबुकच्या माध्यमातून बदनामी केल्याचे, विविध पोस्ट आणि अश्लील फोटो टाकल्याचे गेल्या अडीच वर्षांत१ हजार २७६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.२०१७ मध्ये प्रकारात तिप्पट वाढ२०१६ पर्यंत सायबर क्राईमची संख्या मर्यादित होती. त्यावर्षी शहरात २ हजार ७९ प्रकार घडले होते. मात्र २०१७ मध्ये या प्रकारांत तिप्पट वाढ होत हा आकडा ५ हजार ७४१ वर पोहोचला आहे, तर मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षीदेखील त्यात वाढच झाल्याचे दिसते. २०१६ मध्ये आर्थिक फसवणुकीचे १ हजार १६७ गुन्हे दाखल झाले होते, तर २०१७ मध्ये ही संख्या ४ हजार ३२० झाली होती.मेसेज किंवा फेसबुकद्वारे आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच लॉटरी लागल्याचे सांगणाºया क ॉलवर रिअ‍ॅक्ट होऊ नका. सोशल माध्यमांवर व्हायरल होणारे सर्वच फोटो किंवा व्हिडीओ खरे असतील असे नाही. त्यामुळे खात्री करूनच त्यावर प्रतिक्रिया द्यावी. या गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी शाळे कॉलेजमध्ये अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रमदेखील घेण्यात आले आहे.- जयराम पायगुडे,पोलीस निरीक्षक,सायबर क्राईम. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPuneपुणे