शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Temperature High: पुणेकर उकाड्याने हैराण; ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:59 IST

पुणे : गेले दोन दिवस ४० अंशापर्यंत पोहचलेला पारा सोमवारी थोडा खाली आला असला तरी ढगाळ हवामानामुळे वातावरणातील उष्मा ...

पुणे : गेले दोन दिवस ४० अंशापर्यंत पोहचलेला पारा सोमवारी थोडा खाली आला असला तरी ढगाळ हवामानामुळे वातावरणातील उष्मा वाढल्याने उकाड्याने पुणेकर हैराण झाले. पुढील दोन तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून रात्रीच्या तापमानात वाढ होणार असल्याने पुणेकरांसाठी दिवसाबरोबरच रात्रही उष्ण राहणार आहे.

पुणे शहरात आज कमाल तापमान ३८.९ आणि किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सरासरीच्या तुलनेत हे थोडे अधिक आहे. असे असले तरी सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिल्याने वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उष्मा वाढला. घरापासून बाहेर पडल्यावर अंगातून घामाच्या धारा सुरू होत होत्या. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडल्याचे भासत होते.

पुढील काही दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार असून कमाल तापमान ३९ व किमान तापमान २१ ते २२ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :TemperatureतापमानPuneपुणेweatherहवामानscienceविज्ञानSocialसामाजिक