Pune Corona News: गुरूवारी शहरात उच्चांकी वाढ; ५ हजाराहूनही अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 20:06 IST2022-01-13T20:06:51+5:302022-01-13T20:06:59+5:30

दिवसभरात १९ हजार ८६८ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २८.०४ टक्के आहे

high growth in the pune city on thursday more than 5000 new corona patients | Pune Corona News: गुरूवारी शहरात उच्चांकी वाढ; ५ हजाराहूनही अधिक नवे रुग्ण

Pune Corona News: गुरूवारी शहरात उच्चांकी वाढ; ५ हजाराहूनही अधिक नवे रुग्ण

पुणे : शहरात गुरूवारी पुन्हा कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ झाली असून, आज दिवसभरात ५ हजार ५७१ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.  दिवसभरात १९ हजार ८६८ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २८.०४ टक्के आहे. 

शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्या २५ हजार ७३७ इतकी झाली असून, एकूण कोरोना बाधितांपैकी केवळ ४.३३ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. दिवसभरात २ हजार ३३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण पुण्याबाहेरील आहे. आजपर्यंत शहरात ४० हजार ४८ हजार १७२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ५ लाख ४२ हजार ९८९ जण कोरोना बाधित आढळून आले. यातील ५ लाख ८ हजार ११९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १३३ जण दगावले आहेत.

Web Title: high growth in the pune city on thursday more than 5000 new corona patients