शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा मृत्यू लपवला? पुण्याच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 07:30 IST

रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात ३ जून रोजी दोन महिन्यांच्या बाळाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देपालिका मागविणार खुलासा; आरोग्य विभागाला तब्बल एक आठवड्यानंतर माहिती

पुणे : अवघ्या दोन महिन्यांच्या कोरोनाग्रस्त बाळाचा झालेला मृत्यू खासगी रुग्णालयाने लपविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाला तब्बल एक आठवड्यानंतर माहिती देण्यात आली आहे. पालिकेकडे या मृत्यूची नोंद तात्काळ न होता आठवड्यानंतर का करण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे.रास्ता पेठेतील एका खासगी रुग्णालयात ३ जून रोजी दोन महिन्यांच्या बाळाला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा ७ जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाला या प्रकारचा पत्ताच नव्हता. ही माहिती आम्हाला देण्यात आली नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. कोरोनाची दैनंदिन आकडेवारी तयार करण्यात येत असतानाही ही माहिती 'मिस' होण्यामागे नेमके कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या विविध कोविड सेंटर्ससह खासगी रुग्णालयांमधून दररोजचा अहवाल एकत्रित केला जातो. तरीदेखील ७ जूनला झालेल्या मृत्यूची नोंद पालिकेकडे का करण्यात आली नाही आणि ही माहिती का कळविण्यात आली नाही. सात जूनला घडलेल्या घटनेची नोंद एक आठवड्याने करण्यामागचे प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या प्रकाराबाबत रुग्णालयाला नोटीस देण्याची तयारी पालिकेने चालविली असून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात असल्याचे अधिका?यांनी संगितले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यू