शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'अरे आमची पोर फटाके विकतायेत गांजा नाही', वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट, पोलिसांना खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 16:16 IST

पोरांना फटाके विक्रीचे धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच

कात्रज : दीपावलीचा सण सुरू झाला असून खरेदीसाठी नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. ठिकठिकाणी फटाके स्टॉल देखील लागलेले आहेत. या फटाका स्टॉल साठी महानगरपालिकेकडून रिकाम्या असणाऱ्या जागा फटका स्टॉल साठी भाड्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी काही नियम अटी देखील महानगरपालिकेने घातल्या याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.

अनेकांनी या फटाका स्टॉल साठी परवानगी घेऊन स्टॉल देखील टाकले. कात्रज सह इतर परिसरामध्ये असणाऱ्या स्टॉल धारकांना त्रास होत असल्यामुळे स्टॉलधारकांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांच्याकडून काही ठिकाणचे पोलीस व महानगरपालिकेचे कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याची तक्रार केली त्यानंतर वसंत मोरे यांनी पैसे मागायला आलेल्या एका पोलिसाशी संपर्क केला असता त्या पोलिसानेच ही वसंत मोरे यांची हद्द आहे का असे सांगितले. त्यावर वसंत मोरे यांनी पोस्ट केली आहे. 

पोरांना धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच

दिवाळीतले चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही. याची काळजी घेऊन फटाकड्याचे स्टॉल लावून बसलेले आहेत. ''ते पण व्याजाने पैसे आणून मागच्या दोन दिवसापासून रोज ऐकतोय, अतिक्रमण वाले एवढे मागतात, पोलीस तेवढे मागतात ट्रॅफिक वाले एवढे मागतात, अरे आमची पोर फटाके विकत आहेत गांजा नाही. आज तर एका पोलिस महाशयांनी कमालच केली. एक पोरग त्यांना म्हटलं, वसंततात्या मोरे संग बोला तर साहेब बोलले की ही त्यांची हद्द आहे का? माझी हद्द ठरवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला तेव्हा साहेब हात जोडून विनंती आहे की, पोरांना धंदे करू द्या त्यांची दिवाळी चार दिवसांचीच आहे. तुमची दिवाळी उरलेले 361 दिवस चालते. आमची दिवाळी नीट झाली नाही, तर तुमचा रोज शिमगा होईल तेव्हा उगाच हद्दीच्या भानगडीत पडू नका. नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल असे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हंटल आहे.

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी 2023MNSमनसेPoliticsराजकारणPoliceपोलिस