शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीसाठी लोटली तोबा गर्दी; मागवावा लागला पोलीस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 15:13 IST

Shiv Bhojan Thali : पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तर गर्दी आवरत नसल्याने चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे पोलीस बंदोबस्तात सुरु झाले आहे. 

पुणे : २६ जानेवारीपासून सुरु केलेल्या शिववभोजन थाळीचा वाढता प्रतिसाद वितरकांची मात्र डोकेदुखी ठरत आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये तर गर्दी आवरत नसल्याने चक्क पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीचे पोलीस बंदोबस्तात सुरु झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 'राज्यातील गरीब जनतेला परवडणाऱ्या दरात जेवण मिळावे या उद्देशाने महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ केला आहे. चार दिवस म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी या योजनेचे उदघाटन केले. त्यानंतर कमी दरात, पोटभर अन्न  मिळत असल्याने वितरण केंद्रांवर चांगलीच गर्दी होत आहे.

मात्र दुपारी १२ ते २ अशी ठराविक वेळ आणि केवळ १५० थाळी वितरणाची अट असल्याने अनेकांची निराशा होते आहे.त्यातच पुण्यातील मार्केट यार्ड भागातील हॉटेल समाधान येथे वितरण केंद्रात हमाल आणि इतर मोलमजुरी करणाऱ्यांची गर्दी होत आहे. भुकेची वेळ असल्याने थाळ्या संपल्यावर वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता अखेर हॉटेल प्रशासनाने पोलिसांची मदत घेतली आहे. 

याबाबत माहिती देताना व्यवस्थापक अंकुश मोरे म्हणाले की, ' शिवभोजन थाळीला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र थाळीची वितरण संख्या मर्यादित असल्याने त्या लवकर संपतात. अशावेळी रांगा तोडून धक्काबुक्की होऊ नये, थाळी संपल्यावर वादावादी होऊ नये म्हणून पोलिसांची मदत घेण्यात आली आहे'. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयMarket Yardमार्केट यार्डPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरे