मुळशी तालुक्यातील अत्याचारित कुटुंबाला राष्ट्रीय एकात्मता समितीची मदत ; शासनाची उदासिनता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:15 IST2019-04-25T18:12:19+5:302019-04-25T18:15:41+5:30
मुळशी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील अत्याचारीत कुटुंबियांना राष्ट्रीय एकात्मता समितीकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील अत्याचारित कुटुंबाला राष्ट्रीय एकात्मता समितीची मदत ; शासनाची उदासिनता
पुणे : मुळशी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी मानुसकीला काळीमा फासणारी घटना समाेर आली हाेती. मालक आणि कामागारामध्ये कामावरुन झालेल्या बाचाबाचीत मालकाने कामगाराला विष्ठा खा किंवा आईशी संभाेग कर असे म्हणत मारहाण केली. घाबरुन कामगाराने विष्ठा खालली हाेती. या प्रकरणामुळे कामगार कुटुंबीय घाबरुन गेले हाेते. या कुटुंबाला शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली हाेती. परंतु अद्याप ती मदत मिळाली नाही. या कुटुंबाच्या मदतीला राष्ट्रीय एकात्मता समिती धावून आली असून समितीकडून कुटुंबाला तात्पुरती मदत म्हणून 25 हजार रुपये देण्यात आले आहेत.
काही महिन्यांपूर्वी मुळशी तालुक्यात गंभीर घटना घडली हाेती. मालक आणि कामागारामध्ये कामावरुन झालेल्या बाचाबाचीत मालकाने कामगाराला विष्ठा किंवा आईशी संभाेग कर असे म्हणत मारहाण केली. घाबरुन कामगाराने विष्ठा खालली हाेती. या प्रकरणामुळे कामगार कुटुंबीय घाबरुन गेले हाेते. त्यांनी दुसऱ्या दिवशी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी वीटभट्टी मालक संदीप पवार (रा. वाघजाई मंदिराचे पाठीमागे, जांबे, ता. मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.
दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी स्वतः या कुटुंबियांची भेट घेतली हाेती. तसेच सामाजिक न्याय खात्याकडून त्यांना मदत देखील मंजुर झाली आहे. परंतु सध्या या खात्याकडे निधी नसल्याचे सांगत निधी मिळाल्यानंतर मदत देण्यात येणार असल्याचे या खात्याकडून सांगण्यात आल्याचे राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. दरम्यान ती मदत मिळेपर्यंत या कुटुंबाचा उदनिर्वाह चालावा यासाठी समितीकडून 25 हजार रुपये देण्यात आले. त्याचबराेबर समितीच्या इतर कार्यकर्त्यांनी देखील या कुटुंबाला वेळाेवेळी मदत केली आहे.
या घटनेनंतर या कुटुंबाचा राेजगार बुडाला तसेच त्यांचे राहते घर सुद्धा गेल्याने ते सध्या नातेवाईकांकडे राहण्यास आहेत. त्यांना लवकरात लवकर मदत मिळणे गरजेचे आहे. पवार म्हणाले, सामाजिक न्याय खात्याकडून मदत मंजूर झाली असली तरी ती अद्याप या कुटुंबीयांना मिळाली नाही. खात्याकडे निधी नसल्यामुळे मदत देण्यात न आल्याचे या खात्याकडून सांगण्यात येत आहे. या महिनाअखेरपर्यंत मदत मिळण्याची शक्यता आहे. घडलेली घटना ही अत्यंत गंभीर स्वरुपाची हाेती. या कुटुंबियांचे उदनिर्वाहाचे साधन हिरावल्याने सध्या त्यांना मदतीची आवश्यकता आहे. राष्ट्रीय एकात्मता समितीकडून या कुटुंबाला छाेटीशी मदत करण्यात आली आहे.