शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

साक्षीदारांच्या मनातील भीती दुर होण्यास मदत ; वकिलांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:41 IST

सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे.

ठळक मुद्देसाक्षीदार संरक्षण योजना मंजुरही योजना ख-या आरोपींना शिक्षा सुनावणीसाठी अत्यंत प्रभावी गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार संरक्षण योजना बुधवारी मंजूर केली आहे. या बाबत नियुक्त खंडपीठाने नमूद केले आहे की, साक्षीदारांना देण्यात येणा-या धमक्यांचे प्रकार करून त्या आधारे पोलिसांनी धमकी विश्लेषण अहवाल तयार करावा. साक्षीदाराला न्यायालयात आणण्यासाठी सरकारी वाहन द्यावे, साक्षीदारांना येणा-या फोन व मेलवर लक्ष ठेवावे, साक्षीदारांच्या घरी सीसीटीव्ही व अलार्म आदी बाबी बसवाव्यात, साक्षीदारांच्या जवळच्या व्यक्तीचा फोन नंबर बरोबर ठेवून त्याच्या घराजवळ पेट्रोलिंग करावे, अशा तरतुदी या योजनेत करण्यात आल्या आहेत. ही योजना ख-या आरोपींना शिक्षा सुनावणीसाठी अत्यंत प्रभावी आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया वकिलांनी व्यक्त केल्या. साक्षीदारांच्या सुरक्षेच्या आणि खटल्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत चांगली आहे. मात्र त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. साक्षीदारांवर साक्ष देताना दबाव येवू नये यासाठी यापुर्वी देखील अनेक उपाययोजन करण्यात आल्या आहेत. या योजनेचा गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खात्रीशीर व्यक्तींचीच साक्ष घेतली जावी. त्यात पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते.अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे ----साक्षीदार हे प्रत्येकवेळी प्रत्यक्षदर्शी नसतो. अनेकदा खुन्नशीपोटी किंवा जवळच्या व्यक्तींवर अन्याय झाला आहे, म्हणून साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली जाते. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर अनेकदा साक्षीदार फितूर होतात. खोट्या साक्षीमुळे निर्दोष व्यक्तीला शिक्षा दिली जावू शकते. त्यामुळे दोन्ही बाजुंचा विचार होणे गरजेचे आहे. अ‍ॅड. सचिन ठोंबरे ---खटल्याची पुर्ण जबाबदारी ही साक्षीदारांवर असते. समोर गुन्हा घडलेला असतो तरी साक्षीदार भीतीपोटी पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अशी योजना राबविल्यास साक्षीदारांच्या मनातील भिती नक्कीच दूर होईल. योग्य साक्षीदार पुढे आल्यास शिक्षेचे प्रमाण वाढून गुन्हेगारीला वचक बसेल. या सवार्मुळे सरकारी वकिलांना केस चालवणे अधिक सोपे होईल. अ‍ॅड. विवेक भरगुडे---आरोपी निर्दोष सुटण्यामागे साक्षीदारांनी साक्ष फिरवणे हे एक मुख्य कारण आहे. सबळ  पुरावे नसतील तर आरोपीली शिक्षा दिली जात नाही. त्यामुळे ही योजना मंजुर करून सर्वोच्च न्यायालयाने चांगले पाऊल उचलले आहे. याबाबत आणखी काही कायदे आहेत. मात्र त्यांची योग्य प्रकारे अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.अ‍ॅड. तौसिफ शेख --- मोठ्या खटल्यात फिर्यादींना फितूर करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची सुविधा देणे गरेजेचे आहे. साक्षीदारांच्या बाबत अनेकदा गैरप्रकार देखील होतात. पैसे देवून साक्षीदार उभे केले जातात. त्यामुळे संबंधित केसचा निकाल आरोपींच्या विरोधात लागतो. खरे साक्षीदार असतील आणि आरोपीचा खरच काही रोल नसेल तर मीरीटवर सुटू शकतो. पण अशा वेळी पोलीस आणि साक्षीदार यांची भूमिका महत्त्वाची असते. अ‍ॅड. गायत्री कांबळे ---

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय