नागरिकांच्या सहाकार्याने इंदापूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:59+5:302021-02-05T05:08:59+5:30

माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ...

With the help of citizens, Indapur Municipality will come first in the clean survey | नागरिकांच्या सहाकार्याने इंदापूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येईल

नागरिकांच्या सहाकार्याने इंदापूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम येईल

माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान राबविले आहे. हे अभियान निसर्गाच्या पंचमहातत्वांवर म्हणजेच भूमी, जल वायू, अग्नी, आकाश यांचा समावेश असून, त्यातून शहराच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण मध्येही देशात प्रथमस्थानी इंदापूर नगर परिषद येण्यासाठी इंदापूर शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले.

इंदापूर नगर परिषदेच्यावतीने उत्तरायण सप्ताहा निमित्ताने ( दि. १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२१ ) या कालावधीत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बाेलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे, नगरसेविका हेमलता माळुंजकर, मीना मोमीन, अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, विशाल बोन्द्रे, महादेव सोमवंशी, हमीद आतार, जावेद शेख, सागर गानबोटे, रमेश धोत्रे, युवा उद्योजक सचिन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत पंचमहातत्वावर आधारित घटकांचे पर्यावरणातील महत्व दर्शवणारी कलाकृती, साहित्य, देखावा, प्रकल्प अशा विविध प्रकारे स्पर्धकांनी सादर केली. याची नगर परिषद कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या तज्ज्ञांकडून तपासणी केली व प्रत्येक पंचमहातत्वाच्या घटकातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्याची निवड करण्यात आली.

पृथ्वी विभाग: नागेश राम केंगार, दर्शन धनंजय दळवी, विनय अशोक कचरे.

वायू विभाग: वैष्णव प्रमोद धांगेकर, ऐश्वर्या सुरेश शिंदे, श्रद्धा सौदागर गोडसे.

जल विभाग: हसिबा शमशेर शिकलकर, सागर बापू शिंदे, राजेस्वी जाधव.

अग्नी विभाग: अंकित दीपक चव्हाण,स्नेहल संतोष साबळे, बाबासाहेब रामचंद्र भोंग.

२८ इंदापूर

माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे वितरण करताना नगराध्यक्षा अंकिता शहा व इतर.

Web Title: With the help of citizens, Indapur Municipality will come first in the clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.