शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात छुपी हेल्मेट सक्ती! काय आहे हा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 10:58 IST

नागरिक या नियमाचे पालन का करीत नाहीत याचा विचार कोण केलाय का?

-राजू इनामदार

पुणे : छोटा अपघात झाला आणि त्यात डोक्याला मार लागल्याने अपंगत्व येणे, मृत्यू होण्याचा धोका असतानाही बहुसंख्य दुचाकीस्वार हेल्मेट असतानाही ते का वापरत नाहीत, याचा विचार कोणी करीत नाहीत. नागरिकांवर कायदा थोपवून त्याची कडक अंमलबजावणी करताना नागरिक या नियमाचे पालन का करीत नाहीत, याचा कोणताही विचार आजपर्यंत झाला नाही.

शीत कटिबंधातील देशात केलेले संशोधन व त्यावरून केलेल्या उपाययोजना हा उष्ण कटिबंधात जशाच्या तशा वापरल्याचा जो काही परिणाम दिसून येतो, तो या हेल्मेटबाबत दिसत आहे. युरोपीय देशांत हेल्मेटवर अधिक संशोधन झाले, तितके संशोधन आपल्याकडे झालेले नाही.

का होतो हेल्मेटला विरोध?

  • भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात वापरण्यास सोयीचे होईल, असे हेल्मेट अद्याप बाजारात आलेले नाही. त्यामुळे अशी बोजड हेल्मेट वागवणे, गैरसोयीचे जाते.
  • असे बोजड हेल्मेट घालून उन्हाळ्यात प्रवास करण्यामुळे संपूर्ण डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात तर अनेकजण हेल्मेट वापरणे बंदच करतात.
  • लहान मुले तसेच लोकांना वापरणे सोयीचे होईल अशी हेल्मेट बाजारात उपलब्ध नाहीत.
  • मोटारसायकलला हेल्मेट सुरक्षितपणे लावता येईल, अशी सोय करण्याचे कोणतेही बंधन शासन उत्पादकांवर घालत नाही. मात्र, मोटारसायकल वापरणाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक करते.
  • मोटारसायकलला दोन हेल्मेट लावता येईल, अशी कोणतीही सोय नाही. नव्या दुचाकी आल्या आहेत, त्यांत एकच हेल्मेट ठेवता येईल इतकी जागा आहे. दुसरे हेल्मेट कोठे ठेवणार?
  • त्यामुळे अनेकजण दुचाकी पार्क केल्यावर हेल्मेट हातात घेऊन फिरताना दिसतात.
  • कोणत्याही नियमाला विरोध करणे, ही मानवसुलभ भावना.
  • हेल्मेटच्या उपयुक्ततेबाबतची मनाला भिडू शकेल, अशी जनजागृती करण्यास समाज कमी पडतो.
  • कायद्यानुसार हेल्मेट सक्ती आहे, मात्र पुणे शहरात याबाबतीत गो स्लो हे धोरण स्वीकारले जाईल असे स्पष्ट आश्वासन या सक्तीला होणारा विरोध लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिले होते. पण ते विसरून वाहतूक शाखा आता सीसीटीव्हीचा वापर करत छुप्या पद्धतीने कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करत आहे असा आरोप हेल्मेट विरोधी कृती समितीने केला आहे.

     

माजी महापौर अंकुश काकडे म्हणाले, मोठ्या रस्त्यांवर, हमरस्त्यांवर हेल्मेट सक्ती गरजेचीच आहे, हेल्मेट विरोधी समितीने त्या सक्तीला कधीही विरोध केलेला नाही, मात्र शहरातील गल्लीबोळ व शहरांतर्गत रस्त्यांवरही सक्ती होत असेल तर अयोग्यच आहे. समितीचे तेच मत अजूनही कायम आहे. कायदा मंजूर झाला, अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी शहरात याविरोधात मोर्चा निघाला. त्यात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होत्या, मात्र आता कामाचा व्याप व अन्य अनेक गोष्टींमुळे ते एकत्र येत नाहीत. एकूणच वाहनधारक संघटित नाहीत, त्यामुळे ही छुपी सक्ती आता वेगाने होत आहे, अशी टीका काकडे यांनी केली.

वाहन चालवताना वाहतुकीच्या सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, एकेरी वाहतूक अशा नियमांचे पालन करायलाच हवे याबद्दल दुमत नाही. हे नियम मोडणारे वाहतूक शाखेच्या पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दिसतात. स्मार्ट नंबर प्लेटच्या साह्याने ते वाहनमालकाचा पत्ता शोधून त्यांना छायाचित्र व दंडाची रक्कम असलेले पत्र पाठवतात. त्यात दंडाचे आवाहन केलेले असते. वाहतूक नियंत्रणासाठी असलेले पोलीस चौक, रस्त्याच्या मोक्याच्या ठिकाणी थांबून दंड वसुली करतात ते वेगळेच. दंडाची पावती पाठवतात त्यातही हेल्मेट नसल्याचा नियम लावला जातो व त्यासाठी दंडही आकारला जातो याला समितीचा विरोध असल्याचे काकडे यांनी सांगितले.

फक्त ४ महिन्यात वाहतूक शाखा हेल्मेट नाही या एका कारणापोटी वाहनचालकांना काही कोटी रुपयांचा दंड ठोठावत असेल तर त्याविरोधात आवाज उठवण्याची, त्यांना विरोध करण्याची गरज आहे असे मत काकड़े यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस