शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 12:02 IST

पोलिसांच्या सायबर विभागाकडून सावध राहण्याचे आवाहन..

ठळक मुद्देआंतरराज्य रॅकेटकडून फसवणूक : फ्रेंडशिप क्लबच्या मेंबरशिपसाठी घेतले जातात पैसे

नारायण बडगुजर-पिंपरी : हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का, त्यांचे समाधान कराल का... असे विचारून फोनवरून तरुणांच्या भावना चाळविण्याचा प्रकार केला जात आहे. त्यातून हायप्रोफाईल फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास सांगून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यात आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असून, तरुणांसह वयस्क पुरुषांनाही गंडा घालण्यात येत आहे.  ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन पोलिसांच्या सायबर विभागाकडून केले जाते. असे असतानाही अनेक नागरिक वैयक्तिक माहिती शेअर करतात. सायबर चोरटे त्याचा गैरवापर करून फसवणूक करतात. असेच काही आंतरराज्यीय रॅकेट सक्रीय आहे. दिल्ली, तसेच बांगलादेशच्या सीमावर्ती परिसरातून काॅल सेंटरप्रमाणे त्यांचे कामकाज होते. महिला तसेच तरुणींना विविध राज्यांतील फोन क्रमांक दिले जातात. त्यावर संबंधित तरुणी किंवा महिला संपर्क साधातात.

सुरवातीला हिंदीतून मधूर संवाद साधला जातो. समोरची व्यक्ती मराठीतून बोलत असल्यास काही वाक्य किंवा शब्द मराठीतून बोलून त्यांची नाव, कामाचे ठिकाण, कामाचे स्वरुप आदि माहिती विचारण्यात येते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येतो. त्यानंतर त्यांना पैशांची गरज आहे का, असे विचारून हायप्रोफाईल महिलेचा मसाज कराल का, त्यांचे समाधान कराल का, त्याचे तुम्हाला चांगले पैसे मिळतील, असे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास मिटिंग करण्याबाबत किंवा अपाॅईंटमेंट कधीची चालेल असे विचारले जाते. तसेच कोणत्या भागातील हायप्रोफाईल महिला क्लाएंट उपलब्ध होऊ शकेल, याची माहिती दिली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा फोन करणाऱ्या तरुणीवर विश्वास बसतो. हायप्रोफाईल महिलेसोबत अपाॅईंटमेंट करून तिच्याकडूनच चांगले पैसे मिळणार, या विचाराने त्या व्यक्तीच्या भावना चाळवतात. याचाच गैरफायदा घेऊन फोनवरून संबंधित तरुणी त्यांच्या फ्रेंडशिप क्लबची मेंबरशिप घेण्यास सांगते. त्यासाठी काही पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला किंवा बॅंकेच्या खात्यावर भरायला सांगते. पैसे दिल्यानंतर काॅल सेंटरमधील तरुणीचा फोन बंद होतो. फसवणूक झाल्याचे संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास येते. मात्र पैसे आणि वेळही निघून गेलेली असते.

रॅकेटचा होत नाही पर्दाफाशफसवणुकीच्या अशा प्रकरणांमध्ये आंतरराज्य रॅकेट सक्रीय असून त्यांच्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येतात. संबंधित रॅकेटचे कामकाज सुरू असलेले नेमके ठिकाण शोधून काढणे शक्य होत नाही. तसेच बनावट नावे, बॅंक खाते, सिमकार्ड हे सातत्याने बदलत असल्याने ते ‘ट्रेस’ करता येत नाहीत. संबंधित बॅंक, टेलिकाॅम कंपनी, इंटरनेट आदी यंत्रणांकडून त्याबाबत माहिती दिली जात नाही. परिणामी अशा रॅकेटचा पर्दाफाश होत नाही.

ना हाक ना बोंब...अशा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्ती तक्रार करण्यात पुढे येत नाहीत. समाजातील  प्रतिष्ठा, पत्नी, कुटुंबियांचा दबाव अशा एक ना अनेक कारणांमुळे संबंधित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करीत नाही. परिणामी गुन्हे घडूनही त्याबाबत ‘ना हाक ना बोंब’, अशी परिस्थिती असते. 

सायबर चोरटे संबंधित व्यक्तीच्या भावनांशी खेळतात. प्रलोभने देऊन मोहात पाडतात. त्याला अनेक जण बळी पडतात. त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक होते. सतर्कता हाच त्यावर उपाय आहे. - डाॅ. संजय तुंगार, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम