शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

अंधश्रद्धेचा कहर :रस्त्याच्या शेजारी बळी ठेवत लिंबू मिरची ठेवल्याचा प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 9:26 PM

आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला.

पुणे :आधुनिक युगात आणि पुरोगामी  राज्यात अजुनही जादूटोण्यासारखे प्रकार घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील मुखेकर वस्ती शेजारील रस्त्यावर करणी करण्याच्या हेतूने तीन निष्पाप प्राण्यांची हत्या करून त्यांचे मुंडके रस्त्या शेजारी ओळीने ठेवल्याचा प्रकार गुरूवारी (दि २) सकाळी उघडकीस आला. या प्राण्यांच्या मुंडक्या भोवती नारळ, लिंबे व अघोरी कृत्य करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले आहे. या प्रकारामुळे या परिसरात नागरिक भयभीत झाले आहे. 

कोणीतरी अज्ञात इसमांनी रस्त्याच्या कडेलाच हा सर्व जादू टोण्याचा प्रकार केला असून असे अघोरी कृत्य करणा-यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी  नंदिनी जाधव, अंधश्रद्धा निमृल समितीचे  कार्याध्यक्ष आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. ज्या वस्तीजवळ ही घटना घडली आहे त्या  मुखेकर वस्तीतील जागरूक नागरिकांनी कुठलीही भीती अथवा न घाबरण्याचे आवाहन केले आहे. 

या बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास काही नागरिक शेतीला पाणी देण्यासाठी  दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला  एका मोटारीतून आलेल्या काही नागरिकांनी रस्त्यावर हा प्रकार करत असल्याचे त्यांना दिसले. यात काही महिला व लहान मुलगी ही असल्याचे  त्यांनी सांगितले. पण खरा प्रकार सकाळी उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आला.  पुरुष व महिलांच्या नावाने  कपडे, नारळ, लिंबांचे हार, व इतर साहित्य तसेच पण तीन बोकडांचा बळी देऊन त्यांचे मुंडके या ठिकाणी ओळीत ठेवून त्यांना लिंबाचे हार घालण्यात आले होते.  

सहा महिन्यांपूर्वीही घटला होता प्रकार    

   मागील सहा महिन्यापूर्वी मलठण येथे देखील जादूटोण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्थानिक ग्रामस्थांनी प्रभोधन करून हे सर्व थोतांड असल्याचे पटवून दिले होते. तेथे जादू टोण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य सर्वांसमक्ष जाळून टाकण्यात आले होते. प्रत्यक्षात राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असताना अशा अघोरी घटना घडतातच कशा ? व संबंधित यंत्रणा अशा लोकांचा बंदोबस्त का करत नाही असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी केला आहे.    नागरिकांनी कुठल्याही प्राकाराची भीती बाळगण्याचे कारण नाही तसेच पोलिसांनी देखील या घटनेचा छडा लावून अशा अघोरी कृत्य करणा-या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी अनिसच्या नंदिनी जाधव, तान्हाजी मुखेकर व स्थानिक ग्रामस्थानी केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर