शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महावितरणने हद्दच केली; पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाचीच वीज तोडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 20:49 IST

पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सीओईपी जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुणे : पुणे शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका प्रशासन कठोर पावले उचलत असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नियोजन सुरु आहे.त्यातच कोविड रुग्णालय सुरु करण्याच्या हालचाली सुरु असतानाच परंतु,थकीत बिल न भरल्याने महावितरणने वीज तोडली आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सीओईपी जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या सोमवार पासून हे रुग्णालय सुरु होणार होते. मात्र त्यापुर्वीच ही वीज तोडली गेली आहे. थकबाकी राहिल्याने वीज तोडली गेली आहे. शहरात वीज बिल न भरल्याने अनेकांवर कारवाई होत आहे. थकीत वीज बिल राहिल्याने वीज तोडून अथवा मीटर काढून नेले जात आहे. महावितरणच्या तावडीतून हे जम्बो रुग्णालयही सुटले नाहीये. 

मध्यंतरी जम्बो मधल्या एका विभागाची वीज फक्त तोडली गेली आहे. तिथल्या मिटर रिडींग बाबत अडचण होती. त्यामुळे हे बील भरण्यात आले नव्हते. आम्ही ही रक्कम भरुन वीज पुन्हा सुरु करुन घेवु “असे दिपाली इन्फ्राचे रोहीत छेत्री यांनी सांगितले.

महावितरणने पुण्यात जम्बो रुग्णालयाची वीज तोडली.मात्र पालिकेच्या पाणी विभागाने या कारवाईला एकप्रकारे जोरदार प्रत्युत्तर देत महावितरणच्या वसाहती आणि पाच कार्यालयांचेच पाणी तोडले. यामुळे शहरात महावितरण आणि पाणी विभागामध्ये रंगलेल्या कारवाई नाट्याची जोरदार चर्चा झाली नसती तरच नवल.. 

पुण्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना सर्व सामान्य नागरिकांना सुलभ उपचार उपलब्ध व्हावे या उद्देशातून पुणे महानगरपालिकेने सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर तात्काळ जम्बो कोविड रुग्णालयाची निर्मिती केली होती. मात्र, काहीच दिवसांत येथील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला होता. त्यांनतर प्रशासनाने यात सुधारणा करत पुन्हा एकदा वैद्यकीय यंत्रणा सक्षम केल्यानंतर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु झाले होते. पण दरम्यान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर महापालिका प्रशासनाने जम्बो कोविड सेंटर बंद केले होते. 

......

जम्बो कोविड सेंटरच्या वीज पुरवठ्याबाबत.

पुणे येथील उच्चदाब विजजोडणी असलेल्या जम्बो कोविड सेंटरचा किंवा अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलेला नाही.

वस्तुस्थिती अशी आहे की, सीओईपी परिसरात दिपाली डिझाईनर यांचे कार्यालय आहे. सहा लाखांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाईनर यांना देण्यात आले आहे, असे महापालिकेकडून कळविताच त्यांचा वीज पुरवठा तात्काळ जोडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलmahavitaranमहावितरण