मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 10:08 IST2019-09-21T10:08:15+5:302019-09-21T10:08:53+5:30
मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सदर कॉईल व अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खालील चढणीवर पुण्याच्या दिशेने येणार्या एका ट्रेलरवरुन कॉईल रस्त्यावर पडल्याने पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ही कॉईल बाजुला करण्याकरिता वाहतूक थांबविण्यात आल्याने पुण्याकडे येणार्या मार्गावर चार ते पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सदर कॉईल व अपघातग्रस्त ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरु आहे. सकाळी सकाळी द्रुतगती मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाल्याने सुट्टयांचे नियोजन करुन घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.