मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 03:33 PM2021-07-18T15:33:29+5:302021-07-18T15:33:44+5:30

१६ गाडया रद्द, १७ गाड्याच्या स्थानकात बदल तर १० गाड्याच्या वेळा बदलल्या

Heavy rains in Mumbai disrupted Pune-Mumbai railway service | मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुणे - मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

Next
ठळक मुद्देपुण्यातील इंद्रायणी, डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा समावेश

पुणे : रविवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली आहे. पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.यात इंद्रायणी,डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेसचा समावेश आहे. मध्य रेल्वेने जवळपास १६ गाडया रद्द केल्या आहेत. तर १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला आहे. 
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरीय स्थानकावरील रुळांवर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने गाड्यांना रद्द तर काही गाड्याच्या वेळा बदलण्यात आले आहे. 
 
या गाडया रद्द 

पुणे - मुंबई : डेक्कन क्वीन एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस तसेच मुंबई - जालना , मुंबई - मनमाड ,मुंबई - मडगाव एक्सप्रेस,मुंबई - कोल्हापूर या गाड्याच्या अप - डाऊन दोन्ही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

ह्या गाडया पुण्यापर्यंत धावल्या 

सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, कोल्हापूर - मुंबई एक्सप्रेस, हुबळी - मुंबई एक्सप्रेस, पंढरपूर - दादर एक्सप्रेस, बिदर - मुंबई एक्सप्रेस या गाड्यांच्या मुंबई पर्यत न जाता पुणे स्थानकापर्यंतच धावल्या. त्याचा परतीचा प्रवास पुणे स्थानकावरून सुरू झाला. अशा एकूण १७ गाड्यांच्या शेवटच्या स्थानकात बदल केला.

Web Title: Heavy rains in Mumbai disrupted Pune-Mumbai railway service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.