शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

"महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका"; पुण्यात पूर परिस्थितीवरुन अजित पवारांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 10:51 IST

पुण्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर कोसळेल्या पावसामुळे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफ, सैन्याला मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे एनडीआरएफकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.

"मी पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, एनडीआरएफ आणि अधिकाऱ्यांशी मी फोनवरुन बोललो आहे. एनडीआरएफच्या बोटी आधीच रवाना करण्यात आल्या आहेत. मदत लवकरात लवकर पोहोचत असून आता लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो असून ते कंट्रोल रुममध्ये आहेत," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यासोबत मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून महापालिका आयुक्त विभागीय आयुक्तांची फोनरून चर्चा करत बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे