पुणे : शहरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसाने शहराच्या अनेक भागात रस्त्याना ओढ्याचे स्वरुप आले होते. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाची शिवाजीनगर येथे ५० मिमी नोंद झाली होती. त्याचवेळी लोहगाव येथे ११ मिमी पाऊस झाला तर कात्रज येथे ५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात चांगलीच वाढ झाली होती. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. जिल्ह्यात काल इंदापूर येथे मुसळधार पाऊस झाला तरी पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. आज सकाळपासूनच उकाडा वाढला होता़ दुपारनंतर अचानक आकाशात ढग दाटून आले़ दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरीचा वर्षाव सुरु झाला़ शहराच्या मध्य व पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक होता़ सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ; अर्ध्या तासात ५० मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 19:41 IST
मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज
पुणे शहरात पावसाची जोरदार बॅटिंग ; अर्ध्या तासात ५० मिमी पाऊस
ठळक मुद्देरस्त्यांना आले ओढ्यांचे स्वरुप गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात चांगलीच झाली होती वाढ