शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 12:12 IST

२२ हजार हेक्टरचे झाले नुकसान : जुन्नर, पुरंदर, बारामती, मावळात सर्वाधिक नुकसान..

ठळक मुद्दे भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती

पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६३२ गावांतील २२ हजार ४०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे ४० हजार ७४५ शेतकरी बाधित झाले आहेत. जुन्नर, बारामती, पुरंदर आणि मावळ या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, द्राक्ष या पिकांना अधिक हानी पोहोचली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बी. जी. पलघडमल यांनी दिली. जून ते ऑक्टोबरअखेरीस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. उलट, काही तालुक्यांत ओला दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावळ, मुळशीसह काही तालुक्यांत सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक पर्जन्यमान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने केलेल्या पाहणीत डाळिंब, द्राक्षे, कांदा, भुईमूग, मका, फुलपिके, भात, बाजरी, बटाटा, ऊस, तृणधान्य, गळीत धान्य, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ११५ गावांमधील २४ हजार २६० शेतकरी बाधित असून, त्यांच्या १५ हजार ३६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. खालोखाल बारामतीमधील ७८ गावांतील ३,६०० शेतकºयांचे १,८२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद आहे. त्यात २९८ हेक्टर ऊसक्षेत्राचा समावेश आहे, तर मावळ तालुक्यातील १३२ गावांमधील ३ हजार ६७९ शेतकºयांचे १ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. भोर आणि वेल्हे या तालुक्यांत तुलनेने कमी नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील २८ गावांमधील १५२ शेतकरी बाधित असून, ३२ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. वेल्हा तालुक्यातील २२ गावांमधील ७३ शेतकºयांचे १९ हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. हवेली तालुक्यामधील ६ गावांतील ४८४ शेतकºयांचे १३ हेक्टरवरील भुईमूग, ५५ हेक्टरवरील सोयाबीन आणि १०७ हेक्टरवरील भाजीपाला असे १७५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसानामध्ये भाजीपालापिकाचे सर्वाधिक ७ हजार २५१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. खालोखाल सोयाबीनचे साडेचार हजारांहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे..........भाजीपाला-फळांचे झालेले नुकसान हेक्टरमध्येडाळिंब    १९५द्राक्षे    १२६७केळी    १२कांदा    १०३१भुईमूग    २४३४मका    ८७फुलपीक    ३०२इतर पिके    ३१९भात    ३३०९सोयाबीन    ४६८६बाजरी    १४१बटाटा    २०२ऊस    २९९गळीत धान्य    ४९भाजीपाला    ७२५१ 

टॅग्स :PuneपुणेmavalमावळJunnarजुन्नरBaramatiबारामतीFarmerशेतकरीRainपाऊस