लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:33 IST2019-07-27T19:30:07+5:302019-07-27T19:33:08+5:30
मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे.

लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला
प ुणे (लोणावळा) : मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे. मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली भागातील काही सोसायट्यांना पाण्याचा विळखा पडला आहे. इंद्रायणी नदीला पुर आल्याने कार्ला व मळवली भागातील अनेक सोसायट्यांना पुराचा विळखा पडला आहे. सर्वत्र पुरसदृष्य स्थिती असून पावसाची संततधार कायम असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भुशी धरणाच्या सांडव्यावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्याने धरणाच्या पायर्यावर जाण्यास तसेच भुशी धरण व लायन्स पाँईटकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. लोणावळा व मावळात सर्वत्र पुराचा विळखा बसलेला आल्याने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनीदेखील सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनस्थळांकडे जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.