शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मध्यमवयीन रुग्णांना कोविडनंतर हृदयाची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST

पोस्ट कोविडनंतरच्या काळात नियमितपणे हृदय तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. कोरोना व्हायरस हा केवळ आपल्या फुप्फुसांवर, मेंदूवरच नव्हे ...

पोस्ट कोविडनंतरच्या काळात नियमितपणे हृदय तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. कोरोना व्हायरस हा केवळ आपल्या फुप्फुसांवर, मेंदूवरच नव्हे तर हृदयावर देखील परिणाम करते. एका ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका महिन्याने छातीत दुखणे आणि श्वास लागणे आदी समस्या उद्भवू लागल्या आणि त्यानंतर त्या व्यक्तीने उपचाराकरिता पुण्यातील अपोलो क्लिनिक येथे धाव घेतली. तपासणीदरम्यान करण्यात आलेल्या ईसीजी चाचणी हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीला अशा प्रकारची समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीने अ‍ॅस्पिरिन घेणे बंद केले होते. त्याच्या इकोकार्डिओग्राफीने हृदयाच्या कार्याची चाचणी करण्यात आली. त्या रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची एंजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णाच्या दोन्ही धमनीवर यशस्वीरित्या अँजिओप्लास्टी करून २ दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात देखरेखेखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्याच्यासारखे बरेच रुग्ण आहेत, ज्यांना अशा प्रकारे पोस्ट कोविडनंतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर, न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ३० ते ५० वर्षे वयोगटातील रूग्णाला श्वास घेण्यात अडचणी, दम लागणे आणि खोकला तसेच, हदयाच्या समस्या दिसून आल्या. कोविडची लागण होण्यापूर्वी निरोगी असलेल्या व्यक्तींमध्येही गंभीर प्रकारची पोस्ट कोविड लक्षणे, हृदयासंबंधी विकार आदी समस्या दिसून येऊ लागल्या आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, किरकोळ पॅल्पिटेशन, गंभीर जीवघेणा एरिथमिया, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, तीव्र फुफ्फुसीय रोग होण्यापर्यंतचा असू शकतो.

कोविड संसर्गातून बरे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अशा समस्या दिसून येतात. हृदयाच्या ओपीडीमध्ये भेट देणाऱ्या १० पैकी ५ रुग्णांना हृदयासंबंधी तक्रारी उद्भवत असल्याचे दिसून येते. ज्यांना आधीच हृदयाच्या समस्या आहेत त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

हृदयाचे नुकसान होण्यामागील कारण एखाद्याच्या शरीरात पसरलेला संसर्ग ज्यामुळे हृदयासह काही निरोगी ऊतींचे नुकसान होते. कोविड संसर्गामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या स्नायूंवर विपरित परिणाम होतात. ज्यामुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाहास अडथळे निर्माण होतात. चक्कर येणे, डोकेदुखी होणे, अचानक धडधडणे, उच्च रक्तदाब, उलट्या होणे, घाम येणे आणि श्वास लागणे, छातीत दुखणे यांसारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लवकर निदान आणि त्वरित उपचार मृत्यूदर कमी करण्यास मदत करेल. आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी, फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. (ताजी फळे, भाज्या, धान्य, शेंगदाणे, आणि डाळी यांचे सेवन करा. मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले किंवा जंकफूड खाऊ नका. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे नियमितपणे परीक्षण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करा. दररोज व्यायाम करा, योग्य वजन राखा, अल्कोहोल आणि धूम्रपानचे सेवन करणे टाळा. कोविडनंतर, हृदयाच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवण्यासाठी रूग्णांनी ईसीजी, इकोसारख्या हृदयाच्या तपासणी करून घ्या.

- डॉ. प्रमोद नरखेडे, कार्डिओलॉजिस्ट