शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिर मुलांना गवसला श्रवण‘सूर’ !

By admin | Updated: June 4, 2015 05:32 IST

न्मजात कर्णबधिरपणा आल्याने सामान्य मुलांबरोबर खेळणे, शाळेत जाण्याला मुकलेली २५ मुले आता सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगू

पुणे : जन्मजात कर्णबधिरपणा आल्याने सामान्य मुलांबरोबर खेळणे, शाळेत जाण्याला मुकलेली २५ मुले आता सर्वसामान्य मुलांसारखे जीवन जगू शकणार आहेत. त्यांच्यावर करण्यात आलेल्या क्वाक्लिअर रोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे आणि त्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या बोलणे-ऐकण्याच्या थेरपीमुळे आता ही मुले ‘नॉर्मल’ शाळेमध्ये आपल्या वयाच्या सर्वसामान्य मुलांबरोबर शिकू शकणार आहेत. दानशूरांच्या मदतीतून या कर्णबधिर मुलांना त्यांची श्रवणशक्ती मिळाली आहे.गर्भाशयाच्या वाढीत दोष निर्माण झाल्याने काही मुलांना जन्मल्यानंतर ऐकू येत नाही. ऐकू आले नाही तर ती मुले बोलूही शकत नाहीत. त्यामुळे या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या मुलांना सर्वसामान्य मुलांसारखे सर्वसामान्य शाळांमध्ये शिक्षण घेता येत नाही. पुण्यासह महाराष्ट्रात अशा मुलांसाठी जास्त शाळा नाहीत. त्यामुळे ही मुले जास्तीत जास्त आठवी-दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकतात. त्यानंतर इतर कोर्स किंवा काम करण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. केईएम रुग्णालयातील बिग इअर्स या संस्थेने देणगी जमा करून या मुलांवर मोफत क्वाक्लिअर रोपण आणि त्यानंतर थेरपी देण्यात आली. ही शस्त्रक्रिया आणि थेरपी यशस्वी करून या संस्थेतून ५ ते १४ वयोगटातील २५ मुले नुकतीच बाहेर पडली. याबाबत बिग इअर्स संस्थेच्या संचालिका व इम्प्लांट सर्जन डॉ. नीलम वैद म्हणाल्या, ‘‘आधुनिक उपचारपद्धतीमुळे कर्णबधिर मुलांवर उपचार करून त्यांची गेलेली श्रवणशक्ती मिळवून देणे शक्य झाले आहे.’’ (प्रतिनिधी)