शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जगावं का मरावं आसं झालंय बघा!’; सफाई कामगारांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 18:04 IST

पोरंबाळं कसं जगवावं हे आमच्यासमोर पडलेलं लयी मोठं  कोडं हाय!’...

ठळक मुद्देसुरक्षा उपायांचा अभाव : उघड्या हातानेच करायला लावतात कचरा वेगळा

- गौरव कदम - सहकारनगर : पुणे महानगरपालिकेच्या कात्रज, धनकवडी, सहकारनगर, बालाजीनगर, बिबवेवाडी भागातील नागरिकांनी रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामध्ये हात घालून सफाई कामगारांना कचरा वर्गीकरण करावे लागत आहे. हे अशा प्रकारचे दृश्य कचरा पडलेल्या ठिकाणी दिसून येत आहे. कामगारांच्या हातामध्ये हातमोजे, पायात गमबूट, तोंडाला मास्क अशा प्रकारची प्रावरणे दिसत नाही. प्रावरणाशिवाय कचऱ्याचे वर्गीकरण करत असलेले सफाई कामगार दिसत आहे. यामुळे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याला जबाबदार कोण? पुणे महानगरपालिकेचे प्रशासन की कचरा टाकणारे नागरिक? नक्की कोण ? सन २००६ साली  उच्च न्यायालयाने कचरा वर्गीकरणाच्या संदर्भात निकाल दिलेला आहे की, जो नागरिक कचरा निर्माण करतो त्याच नागरिकांनी कचरा वर्गीकरण करणे व विल्हेवाट लावणे हे बंधनकारक आहे. तसेच, जर नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही आणि विल्हेवाट लावली नाही, तर प्रशासनाने अशा नागरिकांवर कारवाई करावी. असे उच्च न्यायालयाने आदेश देऊनदेखील मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात नाही. प्रशासनामार्फत स्वच्छतेच्या कारवाया केल्या जातात; पण कारवायांमध्ये सातत्य नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामध्ये सफाई कामगारांना हात घालावे लागत आहे. कचरा हाताने वर्गीकरण केल्यामुळे सफाई कामगारांच्या हाताला पायाला जखमा व खरूज होणे व खाज सुटणे तसेच घाणीच्या वासामुळे श्वसनाचे विकार जडले आहेत. त्यामुळे वयाच्या ४५ ते ५५ व्या वर्षीच सफाई कामगारांच्या मृत्यूचे प्रमाण ८०% ते ९०% टक्के दिसून येते. ............काही सफाई कामगारांशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर, ‘आमचे वरचे अधिकारीच आम्हाला कचऱ्यामध्ये हात घालाय लावत्यात आणि कचरा वेगळा करायला लावत्यात बघा. कचरा वेगळा नाही केला तर नोकरीवरून घरी बसवण्याची धमकीबी देत्यात बघा. कित्येक ठेकेदाराच्या कामगारांना तर कामावरून कमी केले बघा. जगावं का मरावं आसं झालंय बघा!’ असे त्यांनी सांगितले.......

आमचा समाज एक तर दलित हाय बघा, नाईलाज हाय आमचा, काय करावं? तेच कळत न्हाय, पोरंबाळं कसं जगवावं हे आमच्यासमोर पडलेलं लयी मोठं  कोडं हाय!’ अशा हृदयस्पर्शी कहाण्या सफाई कामगारांकडून ऐकायला मिळाल्या आहेत.

..................  अशाप्रकारे सफाई कामगारांना घाणीत हात घालून कचºयाचे वर्गीकरण करायला सक्ती करायला लावणाºया व सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आणणाºया अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सफाई कामगार करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSahakar NagarसहकारनगरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न