शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

आरोग्य विमा योजना बारगळली; केंद्र सरकारने हिस्साच भरला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:37 AM

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना अचानक बंद केल्याने दिव्यांग हवालदिल झाले आहेत.

विशाल शिर्के पुणे : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी सुरू झालेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना अचानक बंद केल्याने दिव्यांग हवालदिल झाले आहेत. अनेकांनी नियमाप्रमाणे पैसे भरूनही त्यांना संबंधित कंपनीकडून विमा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने विमा रकमेचा वाटा न दिल्याने ही योजना बारगळल्याचे सांगण्यात येत आहे.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर २०१५पासून दिव्यांगांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. अंधत्व, क्षीण दृष्टी, लेप्रसी, बहिरेपणा, कमी ऐकू येणे, मानसिक आजार असे विविध अपंगत्व असलेल्या शून्य ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ घेता येणार होता. ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांच्या आत असेल, त्यांना ३५५ रुपये भरून या योजनेचा लाभ घेता येईल अशी अट त्यात घालण्यात आली. विमा हप्त्यापैकी ९० टक्के वाटा हा केंद्र सरकारकडून उचलण्यात येणार आहे.या विमा योजनेअंतर्गत वार्षिक २ लाख रुपयांचे संरक्षण कुटुंबाला मिळण्याची सोय झाली होती. मात्र, एप्रिल २०१७पासून अचानकपणे या विमा सेवेसाठी पैसे भरूनदेखील कोणतीच कागदपत्रे विमा कंपनीकडून उपलब्ध होत नाहीत.अखेर पुण्यातील ४० दिव्यांगांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या राजेंद्र वाकचौरे आणि दत्तात्रय भोसले यांच्यामार्फत देशाच्या अपंग कल्याण आयुक्तांना लेखी तक्रार केली. त्यात विमा योजना राबविणाºया न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीकडे पैसे भरूनदेखील विमा कार्ड मिळत नसल्याचे म्हटले आहे.