शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी अपघात विम्यासाठी मुख्याध्यापक आता घरोघरी

By admin | Updated: September 25, 2015 01:13 IST

अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत.

पुणे : अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असताना, विमा योजनेसाठी येणारे प्रस्ताव हे कमी असल्याने आता मख्याध्यापक मयत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव तयार करणार आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिले असून, अहवाल मागविला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगतिले. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहिली ते बारावीतील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘राजीव गांधी शालेय विद्यार्थी अपघात विमा’ ही योजना आहे. अपघातात मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना ७५ हजार रुपये मिळतात. मात्र, या योजनेविषयी पालकांना माहिती नसल्याने प्रस्तावच येत नाहीत. या योजनेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी नुकतेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून प्रस्ताव कमी असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवरून अपघातात विद्यार्थी मयत होत आहेत; मात्र प्रस्ताव कमी आहेत. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांचा शोध घेऊन, त्यांना प्रस्ताव दाखल करण्यास प्रवृत्त करावे व सहकार्य करावे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व तालुक्यांतील गटशिक्षण अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठविले असून, कार्यवाही करावी; तसेच आज अखेरपर्य$ंतचा निरंक अहवाल पाठवावा, असे कळविले आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखाना स्वत: प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)