शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला मारहाण

By admin | Updated: June 27, 2015 03:36 IST

बाबुर्डी (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २५) दुपारी घडला

सुपे : बाबुर्डी (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २५) दुपारी घडला. मुख्याध्यापक एम. के. खोमणे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुख्याध्यापकाची त्वरित बदली करण्याची मागणी केली आहे; अन्यथा शाळा बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.तेजस कुंडलीक लव्हे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील विद्यालय कै. वसंतराव पवार शिक्षण प्रसारक मंडळाचे आहे. या शाळेतील एम. के. खोमणे या मुख्याध्यापकांनी गुरुवारी दुपारी मुले वर्गात गोंधळ घालत असल्याच्या कारणावरून इयत्ता ५वी तील तेजस लव्हे या विद्यार्थ्याला लाकडी फुटपट्टीने बेदम मारहाण केली. त्या मुलाच्या दोन्ही पायाच्या पिंढऱ्याला मारल्याने काळे-निळे व्रण पडले आहेत. शाळेतील इतर कोणत्याही मुलांना मुख्यध्यापकाने मारले नाही. मात्र, अपवाद वगळता तेजसला जी मारहाण झाली ती अशोभनीय आहे, अशी माहिती तेजसचे पालक कुंडलिक लव्हे यांनी दिली. मागील आठवड्यातच शाळा सुरू झाल्या. त्यावेळी नव्याने इयत्ता ५वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. याला एक आठवडा होत नाही, तोच शाळेतील मुख्याध्यापकाने नव्याने शाळेत दाखला झालेल्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे येथील मुख्याध्यापकाची त्वरित बदली करावी; अन्यथा शाळा बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)