शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून...

By admin | Updated: July 9, 2015 03:18 IST

पर्वती दर्शन परिसरात दोन गटांत झालेली हाणामारी केवळ दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून झालेल्या किरकोळ वादातून झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पुणे : पर्वती दर्शन परिसरात दोन गटांत झालेली हाणामारी केवळ दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला म्हणून झालेल्या किरकोळ वादातून झाली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास एक तरुण त्याची दुचाकी साई मित्रमंडळासमोर लावत असताना, दुचाकीचा हेडलाइट डोळ्यांवर पडला, म्हणून तेथे बसलेल्या काही तरुणांसोबत त्यांची वादावादी झाली. त्यानंतर काही वेळातच दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. स्थानिक पोलीस चौकीतील पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जमाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता. दरम्यान, स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते घटनास्थळी धावले. त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरुवातील लाठीमार केला. त्याचा उपयोग न झाल्याने नाइलाजास्तव हवेमध्ये दोन गोळ्या झाडल्यावर जमाव पांगला. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे दोन्ही समुदायांच्या लोकांची संमिश्र वस्ती आहे. त्यामुळे जमाव जमण्यास वेळ लागला नाही. तुर्तास तरी ही घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसत नाही; परंतु तसा तपासही सुरू असल्याचे रामानंद म्हणाले. गेल्या तीन दिवसांत घडलेल्या तीन घटनांचा या घटनेशी संबंध नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांचा प्रतिसाद (रिस्पॉन्स टाइम) कमी झाला आहे. याठिकाणी नागरिकांशी संवाद, पोलीस बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईद्वारे शांतता प्रस्थापित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)‘एसआरपीएफ’ही तैनात घटनास्थळावर एसआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेचा तपास प्रगतिपथावर आहे. दोन्ही बाजूंच्या प्रार्थनास्थळांवर दगडफेक झालेली असल्याचेही सांगण्यात आले. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला नाही. मंगळवारच्या घटनेचे शहरात इतरत्र पडसाद पोलिसांनी उमटू दिलेले नाहीत.