शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरणार

By admin | Updated: April 16, 2017 04:10 IST

महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडे पत्र पाठविण्यात आले

पुणे : महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुखपद राज्य सरकारकडून भरण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य आरोग्य विभागाकडे पत्र पाठविण्यात आले असून या पदासाठीचे सर्व निकष पूर्ण करणारा अधिकारी द्यावा, असे त्यात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.महापालिकेचे विद्यमान प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी येत्या ३० एप्रिलला महापालिकेच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. यापूर्वी या पदावर महापालिकेच्याच आरोग्य विभागातील डॉक्टरांची पदोन्नती करण्यात येत होती. या पदासाठी विशेष निकष आहेत. ते पूर्ण करणारे डॉक्टर पालिकेच्या सेवेत असतानाही प्रशासनाच्या राज्य सरकारकडून हे पद भरण्याच्या प्रयत्नांबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. संघटनेच्या माध्यमातून याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.महापालिकेचे आरोग्य विभागाची व्याप्ती बरीच मोठी आहे. महापालिकेचे मोठे दवाखाने, औषधोपचार केंद्रे तर आहेतच; शिवाय काही वर्षांपासून स्वाइन फ्लू व अन्य साथीच्या आजारांमुळे या पदावरील कामांचे गांभीर्यही वाढले आहे. मात्र, त्यामुळेच या पदाचे कामकाज कायम वादग्रस्त होत आहे. अशा स्थितीत सरकारी अधिकारी या पदावर आला, तर संपूर्ण विभागात शिस्त वाढीला लागेल व प्रभावी काम होईल, अशा अपेक्षेने सरकारी अधिकाऱ्याचा आग्रह प्रशासनाकडून धरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)