तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:38 PM2021-03-17T20:38:55+5:302021-03-17T20:39:50+5:30

आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे.

He was a minister for twenty years, then why the roads in the taluka were not built? Minister of State Dattatraya Bharne | तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

तुम्ही वीस-पंचवीस वर्षे मंत्री होता, मग इंदापूर तालुक्यातील रस्ते का केले नाहीत? राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Next
ठळक मुद्देसहकारी कारखान्यात सामान्य माणसांना सभासद करून दाखवा  

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विरोधक वीस-पंचवीस वर्षे मंत्री पदावर होते त्यांनी का नवे रस्ते का केले नाहीत? का शेतीचा पाणी प्रश्न सोडवला नाही ? आता आम्ही विकास करत आहोत तर पोटशूळ उठला आहे. तुम्हाला तालुक्याच्या जनतेने आता घरी बसवले आहे. तुम्ही आमच्या कामाची चिंता करू नका. दिशाभूल करून तालुक्यातील जनतेला जातीपातीचे राजकारण करण्यासाठी भाग पाडू नका,  असा हल्लाबोल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.  

इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याची पाणी पातळी वाढविणे. याकरिता १ कोटी ७३ लक्ष निधी जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात बुधवार ( दि.१७ ) रोजी राजेंद्र तांबिले, संजय पाटील, भीमा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता ध. जी. कोंडेकर उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे आहे.हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे आहे.सरकार म्हणजे नोटा छापण्याचा कारखाना नाही.आपण जे कर रुपी शासनाकडे निधी जमा करतो.तोच निधी विकास कामांना वापरता येतो यावर सरकार चालते हे लक्षात राहू द्या. त्यामुळे वीज बिल आपण भरणे गरजेचे आहे.व शेतकऱ्यांची वीज देखील अबाधित राहिली पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
_____________
विरोधकांच्या पोटात पोटशूळ....
इंदापूर तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतात. परंतु मी कधीही जातिवाद केला नाही,  करणारही नाही. सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी मी विकासासाठी आणलेला निधी विरोधकांना देखवत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे, अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
...... 

सहकारी साखर कारखाने म्हणता मग सभासद करून का घेत नाही ?
इंदापूर तालुक्यातील निरा - भिमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात आहे. सहकारी साखर कारखाने म्हणून मिरवतात. मात्र कोणालाही सभासद करून घेत नाही. नीरा-भीमा व कर्मयोगी साखर कारखान्यांमध्ये खुल्या पद्धतीने सभासदांना घेऊन दाखवा, असे आव्हान राज्यमंत्री भरणे यांनी विरोधकांना केले आहे.

Web Title: He was a minister for twenty years, then why the roads in the taluka were not built? Minister of State Dattatraya Bharne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.