पुणे : कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीतील गुंड अजय महादेव सरोदे याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट रहिवासी पुरावा आणि खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अजय सरोदे याच्यासह एका एजंटविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याणी नगरमध्ये घडला असल्यामुळे संबंधित गुन्हा झिरो नंबरने येरवडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
दरम्यान, नुकतेच सरोदे याला अटक केल्यानंतर चौकशीत पोलिसांना त्याच्याकडे गोळीबार केलेल्या पुंगळ्यांसह ४०० काडतुसे सापडली आहेत. त्यात २०० रिकाम्या पुंगळ्या असून, २०० जिवंत काडतुसे आहेत. त्याने त्यातील पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव लोणावळा येथील शेतात केला. त्यानंतर त्याने घायवळला काडतुसे दिल्यानंतर घायवळने अहिल्यानगर येथील सोनाई गावच्या शेतात गोळ्या झाडण्याचा सराव केल्याची माहिती देखील पुढे आली आहे.
कुख्यात गुंड नीलेश गायवळच्या गुंडांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री एका तरुणावर गोळीबार केला होता. त्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या अंतराने त्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्यात अटक घायवळ टोळीचा गुंड अजय सरोदे याला अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
सरोदे याला पुणे पोलिसांनी २९ जानेवारी २०२४ या दिवशी पिस्तूल परवाना दिला. त्याने परवान्यासाठी येरवडा पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यासाठी त्याने येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहात असल्याचा पुरावा अर्जावर नमूद केला होता. पोलिसांनी त्या पत्त्यावर पाहणी केली असता, तो पत्ता अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. तसेच अर्जासोबत त्याने त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती दिली होती. वास्तविक, त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते. त्याने खोटा पत्ता व प्रतिज्ञापत्र देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
Web Summary : Gangster Ajay Sarode obtained a gun license with false documents. He practiced shooting in Lonavala, gave bullets to Ghaywal, who also practiced. Sarode was arrested after a shooting incident, revealing his illegal activities and false information provided to police for the license.
Web Summary : गुंडे अजय सरोदे ने झूठे दस्तावेजों से बंदूक का लाइसेंस प्राप्त किया। उसने लोनावाला में शूटिंग का अभ्यास किया, घायवाल को गोलियां दीं, जिसने भी अभ्यास किया। सरोदे को एक शूटिंग की घटना के बाद गिरफ्तार किया गया, जिससे उसकी अवैध गतिविधियां और लाइसेंस के लिए पुलिस को दी गई झूठी जानकारी का खुलासा हुआ।