शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी म्हणून बसले अन् दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवत रिक्षा घेऊन पसार झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 20:11 IST

पोलिसांनी केली दोन जणांना अटक

पुणे : प्रवासी म्हणून रिक्षा बसून मुंढवा परिसरात नेऊन दगडाने मारहाण करण्याचा धाक दाखवून ८० हजार रुपयांची रिक्षा चोरुन नेणार्‍या दोघांना बंडगार्डन पोलिसांनीअटक केली. 

विशाल दिलीप करपते (वय २१) आणि विकी गोपाल बुरघाटे (वय २५, दोघेही रा. हांडेवाडी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल अग्रवाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

कुणाल हे पुणे रेल्वे स्टेशनच्या गेट नं. ४ येथे २७ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. विशाल व विकी हे कुणाल यांच्या रिक्षांमध्ये बसले. हडपसर येथील ससाणेनगर येथे जायचे आहे, असे त्याांनी सांगितले. कुणाल यांनी त्यांचा मित्र सचिन पाटील यांनाही बरोबर घेतले. त्यानुसार ते मुंढवा येथील वाडेकर वस्तीजवळ आले असताना त्यांना या दोघांनी रिक्षा थांबवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी दगडाने मारण्याचा धाक दाखवून रिक्षा जबरदस्तीने पळवून नेली होती.

कुणाल यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन या घटनेची माहिती व रिक्षा नंबर दिला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने रिक्षाचा शोध घेऊन दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकauto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस